Vijay Sardesai's Facebook account hacked Dainik Gomantak
गोवा

विजय सरदेसाई यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; विरोधकांवर निशाणा

विजय सरदेसाई यांची या प्रकाराबाबत विरोधकांवर टीका: पोलिसांत तक्रार दाखल

दैनिक गोमन्तक

Vijai Sardesai: विधानसभा मतदानाला गोव्यात अवघे काही तास राहीलेले असताना मतदानाआधी प्रचंड राजकीय रणधुमाळी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे काल एका स्टींग ॲापरेशनच्या माध्यमातून काही उमेदवार दुसऱ्या पक्षांत जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच आता गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Hack) झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

यासंदर्भातील माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. दरम्यान त्यांनी तत्काळ या प्रकाराबद्दल पोलिस तक्रार नोंदवली असून फेसबुकच्या टीमला देखील याबाबत सूचित केले आहे. त्यांच्या अकाऊंटवरून जर काही गैर संदेश आला असल्यास त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. असे घाणेरडे राजकारण करून अपप्रचार केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगातर्फे उद्या पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आली असल्याचे मत मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी व्यक्त केले. जनता नेमके कुणाला मतदान करणार हे आपल्याला 10 मार्चला कळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

SCROLL FOR NEXT