Vijay Sardesai

 

Dainik Gomantak 

गोवा

फातोर्ड्यातील बंद केलेली कामे जर...:विजय सरदेसाईंचा इशारा

विकासाचा मॉडेल फातोर्डा (fatorda) संपूर्ण राज्यासमोर आणण्याच्या दृष्टीने मतदारसंघात सुरू केलेली 22 कोटींची विकासकामे हातात घेतली आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: विकासाचा मॉडेल फातोर्डा संपूर्ण राज्यासमोर आणण्याच्या दृष्टीने मतदारसंघात सुरू केलेली 22 कोटींची विकासकामे हातात घेतली आहेत ती पूर्ण झाल्यास फातोर्ड्यात भाजपाचा पराभव निश्चित हे जाणल्यामुळे एका खोट्या तक्रारीची दखल घेऊन सरकारने ही कामे बंद केली आहेत असा आरोप गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी करून 24 तासात ही पुन्हा सुरू केली नाहीत तर परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा दिला.

मडगावच्या (Margao) नगरसेवका बरोबर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय सरदेसाई यांनी आरोप केला. 11 पैकी 8 प्रभागातील कामे बंद पाडणाऱ्या भाजपाला (BJP) आता लोकांनी प्रश्न विचारावा असे सरदेसाई म्हणाले. ही कामे बंद पाडण्यात दामू नाईक यांचा हात आहे हे आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन सांगू असा इशारा त्यांनी दिला. 24 तासात ही कामे परत सुरू झाली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून ज्या तरेचे आंदोलन करतील त्याचा लोकांनाही त्रास होऊ शकतो आणि त्याला पूर्णतः भाजप जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) फातोर्डा मतदारसंघात आले होते त्यावेळी त्यांनी फातोर्ड्या डबल इंजिनचा विकास केला जाईल असे सांगितले होते. मात्र हे डबल इंजिन फातोर्ड्यालाच डिरेल करण्यासाठी पुढे सरले आहे असे सांगून हे कदाचित दुसरीकडे खपवून घेतले जातील पण फातोर्ड्यात घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, ही कामे सुरू करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री सावंत यांनी मंजुरी दिली मग आताच त्यांना या प्रकल्पात खोट का दिसून आली असा सवाल त्यांनी केला. हे विचारण्यासाठी आपण मुख्यमंत्री सावंत याना फोन केला पण त्यांनी तो घेतला नाही. कामे बंद केली म्हणून जिंकून येत नाहीत उलट पराभूत होतात हे भाजपला नगरपालिका निवडणुकीत कळून आले त्यामुळे आताही ही कामे बंद करून आपण जिंकून येणार या भ्रमात दामू नाईक यांनी राहू नये. यावेळी त्यांचा पराभव आणखी जास्त मतांनी होईल असे ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष लिंडन परेरा आणि अन्य नगरसेवकांनी आपली मते मांडली. दामू नाईक विकास अडवीत असून ते जेव्हा मते मागायला येणार तेव्हा लोक त्यांना हा प्रश्न विचारणार असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT