Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai Meets Nitin Gadkari: वेस्टर्न बायपास स्टिल्टसह 'या' विषयांवर विजय सरदेसाईंनी घेतली गडकरींची भेट

सरदेसाई: विकास कामासंदर्भात मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Sardesai Meets Nitin Gadkari: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि गोव्यातील पायाभूत सुविधांच्या बाबतीच्या गंभीर समस्या त्यांच्या नजरेस आणून दिल्या. पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत हेही त्यांच्या बरोबर होते.

सरदेसाई यांनी गोव्यात रस्त्यांचे जाळे लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि गोमंतकीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून त्वरित लक्ष आणि हस्तक्षेप आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देणारे निवेदन गडकरी यांना सादर केले.

बाणावली गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 च्या वेस्टर्न बायपासच्या भागावर लक्ष केंद्रित करणारी मुख्य विनंती त्यात होती. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रमुखांनी खारेबांद ते वार्का या भागातील हा रस्ता स्टिल्ट्सवर बांधण्याचा प्रस्ताव दिला.

ज्यामुळे स्थानिक पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल आणि वाहतूक सुरळीत होईल. करमल घाटातून जाणारा राष्ट्रीय 66 हा मार्ग झाडे न कापता पुल बांधून पूर्ण करावा, जेणेकरून हजारो झाडे वाचवता येतील, परिसराचे पर्यावरण आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.

पर्यटकाना पश्चिम घाट आणि किनारपट्टीच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी एक नवीन दृष्टी मिळू शकेल, असे मत व्यक्त केले.

सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्र्यांना या गंभीर प्रकल्पांचे परीक्षण करून त्यांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आवश्यक निधीचे तरतूद करण्याची विनंती केली.

गोवा फॉरवर्ड पार्टी अशा उपक्रमांना पुढे नेण्यासाठी वचनबद्ध आहे, जे कनेक्टिव्हिटी वाढवतील, गर्दी कमी करतील, रस्ते सुरक्षा सुधारतील आणि गोव्यातील सर्वांगीण विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देतील, असे सरदेसाई प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

‘पे टॉयलेट’ची आवश्‍यकता

गोव्यातील राष्ट्रीय महामार्गालगत, विशेषत: महिलांसाठी स्वच्छतागृहांच्या अभावाबाबत एक उल्लेखनीय मुद्दा उपस्थित करण्यात आला.

सरदेसाई यांनी रहिवासी आणि पर्यटक या दोघांच्याही सोयी आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी सुस्थितीत ‘पे टॉयलेट’ उभारण्याचे आवाहन केले.

वारसा स्थळांचे जतन करा

भोमा आणि खोर्ली गावांच्या बाजूने बायपास बांधणे, रहिवाशांचे विस्थापन रोखणे आणि गोव्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेली सातेरी आणि महादेव मंदिरे सांभाळून ठेवणे आवश्‍यक आहे.

महामार्गाची बांधणी करताना ग्रामस्थांना त्रास होईल, अशी कृती नको. शिवाय वारसा स्थळांचे जतन करून रस्ते बांधावे, असे मत सरदेसाई यांनी गडकरी यांच्याकडे व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT