Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: मांडवीतील कॅसिनो जमिनीवर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशिल

तोरसे येथील एका हॉटेलमध्ये कॅसिनो चालत असल्याचा केला आरोप

दैनिक गोमन्तक

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी कॅसिनोच्या मुद्यावरुन गोवा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मांडवी नदीतील कॅसिनो आता जमिनीवर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहे. असा आरोप त्यांनी केला.

(Vijay Sardesai alleged goa government)

पेडणे तालुक्यात एका हॉटेलमध्ये कॅसिनो चालतो - सरदेसाई

सरदेसाई म्हणाले की, गोवा सराकारने अर्ध्या अधिक जमिनीवरील कॅसिनो पेडणे तालुक्यात आणण्याचा घाट घातला असतानाच तोरसे येथील राष्ट्रीय महामार्ग 66 च्या एका हॉटेलमध्ये छोटी खाणी कॅसिनो चालत असल्याचा आरोप केला आहे. आमदार विजय सरदेसाई यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी या व्हिडीओमध्ये पेडणे तालुक्यात एका हॉटेलमध्ये कॅसिनो चालत असल्याचा आरोप केल्याने पेडणे तालुक्यात खळबळ माजली आहे.

कोणत्या ठिकाणी हा कॅसिनो चालतो

कोणत्या ठिकाणी हा कॅसिनो चालतो. काही नागरिकांनी याची विचारणा पोलिसांना फोन करून केली. परंतु पोलिसांनाही याचा पत्ता लागत नसल्याचे म्हटले आहे. त्यामूळे लोक पोलिसांविषयी संशय व्यक्त करत असल्याचं सध्या चित्र आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 वरील एका हॉटेलमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी कॅसिनो चालू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामूळे पोलिसांना माहिती लागत नाही. की यात आणखी काय गौडबंगाल आहे. हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT