Vijai Sardesai Slams Goa Government Dainik Gomantak
गोवा

औद्योगिकरणाच्या नावाखाली झुआरीतील जमिनींची लूट; विजय सरदेसाईंचा आरोप

मंत्री या जमिनी बाहेरच्या खाजगी बिल्डरना विकत असल्याचा सरदेसाईंचा आरोप

Kavya Powar

Vijai Sardesai Slams Goa Government

औद्योगिकरणासाठी झुआरी येथील जमिनी सरकारला देण्यात आल्या. मात्र सरकारने या जमिनींची लूट केली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. या जमिनी सरकारमधील मंत्र्यांनी स्वत:च्या घशात घातल्या असल्याचे मत सरदेसाईंनी व्यक्त केले आहे.

सरकारला दिलेल्या या जमिनींचा वेगळाच वापर होत आहे. मंत्री या जमिनी बाहेरच्या खाजगी बिल्डरना विकत आहेत.

त्यामुळे सरकारने विकासाच्या नावावर जमिनींची लूट केली असल्याचे मत त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, माझी मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेत्याशी स्पर्धा नाहीय. मी आणि गोवा फॉरवर्ड हे आपला गोवा आणि गोव्याच्या लोकांसाठी लढण्यासाठी आलो आहोत.

दरम्यान, विजय सरदेसाई भाजप मंत्री रामदास आठवले यांच्यावरही निशाणा साधला आहे. गोव्‍यात एसटी समाजाची लोकसंख्‍या कमी असल्‍याने विधानसभेत त्‍यांना आरक्षण मिळणे अशक्‍य, असे वक्‍तव्‍य करून नंतर केंद्रीय सामाजिक न्‍यायमंत्री रामदास आठवले यांनी काेलांटी मारली.

त्यावर सरदेसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना आठवले हे सामाजिक न्‍यायमंत्री की अन्‍यायमंत्री, असा सवाल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT