Vijai Sardesai  X
गोवा

Goa Politics: "मी भाजपमध्ये जाणार, ही केवळ वावडी", अफवा पसरवणाऱ्यांची तोंडं सरदेसाईंनी केली बंद VIDEO

Vijai Sardesai BJP Rumours: राज्याच्या राजकारणात गोवा फॉरवर्ड पार्टीचे सर्वेसर्वा आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्याच्या राजकारणात गोवा फॉरवर्ड पार्टीचे सर्वेसर्वा आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सरदेसाई यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यात त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना केवळ 'अफवा' असल्याचे म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विजय सरदेसाई भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांणा उधान आले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना विजय सरदेसाई यांनी या चर्चांचा समाचार घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये सरदेसाई मिश्किलपणे पण ठामपणे म्हणतात, "माझ्या भाजपमध्ये (BJP) जाण्याबद्दल नेहमीच अफवा पसरवल्या जातात. हा एक न थांबणारा सिलसिला झाला आहे." त्यांनी स्पष्ट केले की, अशा अफवा मुद्दामून पसरवल्या जातात जेणेकरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल.

विरोधकांची खेळी की केवळ अफवा?

विजय सरदेसाई हे सध्या गोव्यातील (Goa) भाजप सरकारवर टीका करण्यात सर्वात आघाडीवर असणारे नेते आहेत. भ्रष्टाचार, पर्यावरण आणि स्थानिक प्रश्नांवरुन ते सातत्याने सरकारला धारेवर धरत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येणे, हे अनेकांसाठी धक्कादायक होते. सरदेसाई यांच्या मते, त्यांच्या राजकीय प्रतिमेला तडा घालण्यासाठी किंवा त्यांच्या समर्थकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी हे विरोधकांचे कारस्थान असू शकते.

"मी गोव्याच्या हितासाठी ठाम"

सरदेसाई यांनी आपल्या व्हिडिओमध्ये पुढे म्हटले की, गोवा फॉरवर्ड पार्टी गोव्याच्या अस्मितेसाठी आणि गोमंतकीयांच्या हक्कासाठी लढत आहे. सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा आपला कोणताही विचार नाही. "मी जिथे आहे तिथेच आनंदी आहे आणि गोव्याच्या जनतेचा आवाज बनून काम करत राहणार," असेही त्यांनी स्पष्ट केले.

या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय तर्कवितर्कांना तूर्तास पूर्णविराम मिळाला असला, तरी गोव्याच्या राजकारणात 'कधी काय होईल' याचा नेम नसतो, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

SCROLL FOR NEXT