Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa: गोव्यातील महागाई दुप्पट! सायबर गुन्हे वाढले, पर्यटक 40 % कमी झाले; सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

Vijai Sardesai: राज्य सरकार सायबर गुन्हेगारी थोपविण्यात अपयशी, सरकारने आपल्या कामांच्या प्राधान्यक्रमाला तिलांजली दिल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Sameer Panditrao

सासष्टी: सरकारी संकेतस्थळे सद्या सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनले असून राज्य सरकारच्या कित्येक संकेतस्थळांवर हल्ले केले जात आहेत. अनेक खात्यांच्या योजना व इतर कार्यक्रमांसमोर कॅसिनो किंवा इतर जाहिराती दिसत आहेत.

मात्र, राज्य सरकार सायबर गुन्हेगारी थोपविण्यात अपयशी ठरत आहे. राज्य सरकारने आपल्या कामांच्या प्राधान्यक्रमाला तिलांजली दिल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

महिला व बाल कल्याण खात्याच्या संकेत स्थळावर असाच प्रकार घडला आहे या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरदेसाई यानी वरील माहिती दिली.

त्यांनी पुढे सांगितले की गोव्यात महागाई देशाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. देशात महागाई दर ३.१६ आहे तर गोव्यात ६.९५ दर आहे, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली. गोव्यातील सर्वसामान्य लोक महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. गोव्याची आर्थिक व्यवस्था ढासळत असल्याचे हे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे पर्यटक वाढलेले आहेत, असे जरी सांगत असले तरी गोव्यात पर्यटक ४० टक्क्यांनी कमी झाले आहेत,असेही ते म्हणाले.

‘ते’ ठेकेदार कुणी नेमले; सीएमनी स्पष्ट करावे!

कला अकादमीचे निकृष्‍ट दर्जाचे काम ज्‍या ठेकेदाराने केले त्‍या त्रुटी त्‍याच ठेकेदाराकडून पूर्ण करून घेणार आणि नंतर त्‍याला त्‍याला काळ्या यादीत टाकणार, असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी वक्‍तव्‍य केले आहे, त्‍याचे गोवा फाॅरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी स्‍वागत केले आहे. मात्र निविदा न काढता अशा ठेकेदाराला या कामासाठी कुणी नेमले आणि ही नेमणूक करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर सरकार काय कारवाई करेल, याचे स्‍पष्‍टीकरण मुख्‍यमंत्र्यांनी गोव्‍याच्‍या जनतेला द्यावे, अशी मागणी त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

SCROLL FOR NEXT