MLA Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grabbing Case: पुढारी, पोलिस आणि गुन्हेगारांची मिलीभगत, सुलेमानच्या व्हिडिओनं पर्दाफाश केला; सरदेसाई बरसले

Vijai Sardesai: गोव्‍यात राजकारणी आणि काही गुन्‍हेगार यांची भ्रष्‍ट युती असून त्‍यांना गोव्‍यातील पोलिसांचीही साथ आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोव्‍यात राजकारणी आणि काही गुन्‍हेगार यांची भ्रष्‍ट युती असून त्‍यांना गोव्‍यातील पोलिसांचीही साथ आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. सुलेमान खान याच्‍या व्‍हिडीओने ते उघड केले आहे.

काही राजकारणी गोव्‍यातील (Goa) जमिनी लाटण्‍यासाठी गुन्‍हेगार आणि पोलिस यांचा कसा वापर करतात हे त्‍यातून स्‍पष्‍ट होत आहे. गोव्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था संपूर्णपणे कोसळलेली आहे, हेच त्‍यातून दिसून आलेले आहे, असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे. भू बळकाव प्रकरणी फरार आरोपी सुलेमानच्‍या व्‍हिडिओवर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना सरदेसाई यांनी, गोव्‍यात गुन्‍हेगारांना राजकारण्‍यांचे कसे अभय आहे हे स्‍पष्‍ट होते,असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

जमीन बळकाव प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी न्‍या. जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली जो आयोग नेमला होता, त्‍या आयोगाचा अहवाल वाचल्‍यावर या घोटाळ्‍यात कोण कोण आहेत हे कळून चुकते. या सर्वच प्रकरणांची जबाबदारी मुख्‍यमंत्री प्रमाेद सावंत (CM Pramed Sawant) यांच्‍यावर येत असल्‍याने त्‍यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अन्‍यथा गोवा आणखी गुन्‍हेगारीच्‍या खाईत लोटला जाईल, असे सरदेसाई यांनी एका व्‍हिडिओद्वारे म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT