Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपशी काहींचे ‘जॉईंट व्‍हेंचर’! सरदेसाईंचा अमित पाटकरना टोला; भूरूपांतरणावरुन रंगला कलगी तुरा

Vijai Sardesai: या संबंधात आपल्‍या एक्‍स अकाऊन्‍टवर सरदेसाई यांनी ट्‍वीट केले आहे, त्‍यात १६ बी च्‍या तरतुदीखाली या जमिनीचे रुपांतरण झाले आहे, तरी हे रुपांतरण मी २०१९ पर्यंत नगरनियोजन मंत्री असतानाचे नव्‍हे.

Sameer Panditrao

मडगाव: डिचोली येथील काँग्रेसच्‍या ‘संविधान बचाव’ कार्यक्रमाच्‍यावेळी एका व्‍यक्‍तीकडून कारापूर येथील ५ हजार चौ.मी. जागेचे विजय सरदेसाई यांच्‍या मंत्रिपदाच्‍या काळात रुपांतरण झाले, असा उल्‍लेख असलेला आणि त्‍या उल्‍लेखाला अप्रत्‍यक्षरित्‍या काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर हे समर्थन देत असल्‍याचा व्‍हीडिओ समाज माध्‍यमांवर प्रसारित झाल्‍यानंतर हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे.

मात्र त्‍यातून काहीजणांचा भाजपशी असलेल्‍या ‘जाॅईंट व्‍हेंचर’चा पदार्पाश झाला आहे, अशा आशयाचे ट्‍वीट करून विजय सरदेसाई यांनी पाटकर यांचे नाव न घेता त्‍यांना टोला हाणला.

या संबंधात आपल्‍या एक्‍स अकाऊन्‍टवर सरदेसाई यांनी ट्‍वीट केले आहे, त्‍यात १६ बी च्‍या तरतुदीखाली या जमिनीचे रुपांतरण झाले आहे, हीही गोष्‍ट खरी तरी हे रुपांतरण मी २०१९ पर्यंत नगरनियोजन मंत्री असतानाचे नव्‍हे. असे सांगून चौकशीत हे रुपांतरण २०२१ मध्‍ये झाले आहे, असे म्‍हटले आहे.

मी जर जे काय बोलत आहे ते चुकीचे असल्‍यास हा आरोप करणाऱ्या व्‍यक्‍तीने सत्ताधारी गटाने किंवा या गटाचे ‘जाॅईंट व्‍हेंचर’ असलेल्‍यांनी सिद्ध करून दाखवावे,असे आव्हान आमदार सरदेसाई यांनी दिले. आमचा गाेवा फॉरवर्ड पक्ष लोकांमध्‍ये जाऊन लोकांचे म्‍हणणे ऐकून घेतो त्‍याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.

यामुळे काहीजण वैफल्‍यग्रस्‍त झाले आहेत. त्‍यांना आम्‍हाला प्रतिसाद मिळू नये, असे वाटत असून आमच्‍या मोहिमेत खोडा घालण्‍यासाठीच ते असले प्रकार करत आहेत. मात्र, जनतेला खरे काय ते माहीत आहे. त्‍यामुळे अशा फुटीरवादी शक्‍तींना ते थारा देणार नाहीत, असे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT