Goa Forward Party | Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: माध्यान्ह आहार योजनेत गोव्याच्या गटांना डावलून गुजरातच्या कंपनीला ठेका देण्याचा डाव

विजय सरदेसाईंचा आरोप; विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार

दैनिक गोमन्तक

Vijai Sardesai on Mid Day Meal: गोव्यातील शाळांना माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या गोव्यातील स्वयंसेवा गटांना डावलून सरकार गुजरात येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देऊ पाहात आहे. मात्र गोवा फॉरवर्ड पक्ष हे होऊ देणार नाही.

या विरोधात आम्ही पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

आज स्वयंसेवा गटाच्या सदस्यांनी गोयकार घरात सरदेसाई यांची भेट घेतली. सरकार आमच्यावर अन्याय करत असल्याचे सांगत त्यांनी सरदेसाईंकडे आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले.

त्यावर सरदेसाई म्हणाले की, मी आताच जास्त काही बोलत नाही. मात्र गोव्यातील गटांचे पोट मारून गुजरातच्या कंपनीला गोव्यात कोण आणू पाहात आहे? त्यात कोण भागीदार आहेत? त्याचा फायदा कोणाला होणार? या सगळ्यांचा भंडाफोड मी विधानसभेत करेन.

सरकार गोव्यातील गटांशी फक्त एक वर्षाचा करार करते आणि गुजरातच्या कंपनीकडे 15 वर्षांचा कंत्राट करत आहे. गटांकडून मिळणारे जेवण योग्य प्रकारचे नाही, असे सांगून हे काम गुजरातच्या कंपनीकडे देण्यात येत आहे असा आरोप सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT