Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दक्ष पोलिसांमुळे कैद्याचा पलायनाचा डाव फसला

हा कैदी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला उपचारासाठी दाखल केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police कारागृहातून पलायनाच्या तयारीत असलेल्या एका कैद्याला तेथील सतर्क पोलिसांनी पकडले. हा कैदी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला बांबोळी येथे मानसोपचार इस्पितळात दाखल केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रदीप खर्को असे या कैद्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.7) दुपारी 3.10 च्या सुमारास घडली. या कैद्याला कारागृहातील पहिल्या मजल्यावर ठेवले होते. यावेळी अंतर्गत भिंत ओलांडून त्याने उडी मारली.

हा प्रकार कारागृहाच्या वॉच टॉवरवरील पोलिसांनी पाहिला आणि त्यांनी कारागृहाच्या इतर तुरुंग रक्षकांना सतर्क केले. पोलिसांनी तो कारागृहाच्या संरक्षक भिंतीवर चढून उडी मारण्याच्या तयारीत असतानाच त्याला पकडले.

उडी मारतेवेळी त्याच्या गुडघ्याला किरकोळ जखम झाली. तुरुंग रक्षकांची कारागृहातील वर्दळ कमी झालेली पाहून त्याने पलायनाचा बेत आखला. हा कैदी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने त्याला मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेमध्ये उपचारासाठी दाखल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT