Cash For Job scam Goa Viral Video  Dainik Gomantak
गोवा

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Cash For Job scam Goa: जेलमधून बाहेर येताच व्यक्ती माणिकरावला फुलांचा हार घालताना दिसतोय, एवढंच नाही तर त्याचं, "वेलकम टू गोवा सिंघम" असं म्हणत स्वागत सुद्धा केलेलं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय

Akshata Chhatre

वाळपई: गोव्यात अजूनही पैसे घेऊन नोकरी देण्याची प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. राज्यात कित्यकजणांना सरकारी नोकरीचे अमिश दाखवून फसवण्याचे प्रकार पोलीस हुडकून काढत आहेत आणि या दरम्यान कोलवाळ जेलच्या बाहेरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये कॅश फॉर जॉब स्कॅम म्हणजेच सरकारी नोकरी घोटाळ्यात अडकलेल्या माणिकराव राणे नावाच्या आरोपीला सुटकेनंतर हार घालत स्वागत करण्याचा प्रसंग घडला.

मंगळवार (दि. 21 नोव्हेंबर) रोजी रावण, केरी सत्तरी इथे राहणाऱ्या माणिकराव राणे नावाच्या संशयित आरोपीला पोलिसांनी जेल मधून रवाना केलं. माणिकराव राणे यांच्या विरोधात तब्बल चार लोकांना 21 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा करण्यात आला होता, त्याने लुबाडलेल्या प्रत्येकाला फक्त सहा दिवसांच्या आत सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

जेलमधून बाहेर येताच त्याचा एक जवळचा व्यक्ती माणिकरावला फुलांचा हार घालताना दिसतोय, एवढंच नाही तर त्याचं, "वेलकम टू गोवा सिंघम" असं म्हणत स्वागत सुद्धा केलेलं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर

मडगावातील 16.12 लाख रुपयांच्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍यात मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पूजा सरदेसाई यांनी संशयित विषया गावडे आणि सोनिया आचारी या दोघींना 50 हजारांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. या दोन्ही संशयितांना गेल्या शनीवारी अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT