Watch Video Dainik Gomantak
गोवा

Watch Video: गोव्यातील मुस्लिम बांधवांचा पाकिस्तान टीमला पाठिंबा?? खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना तुम्ही कोणत्या टीमला पाठींबा देताय असे विचारतो, त्यावर ते लोक 'पाकिस्तान' असे उत्तर देतात.

Pramod Yadav

गोव्यातील मुस्लिम बांधव पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला पाठिंबा देत असल्याचा एक व्हिडिओ समोर झाला आहे. यात एक पर्यटक व्हिडिओ ब्लॉगिंग (Video Blogging) करताना दिसत असून, हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना तो तुम्ही कोणत्या टीमला पाठींबा देताय असे विचारतो, त्यावर ते लोक 'पाकिस्तान' असे उत्तर देतात.

काय आहे नेमका व्हिडिओ??

अतुल नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवरती हा व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचे ट्विटर (Twitter) अकाऊंट व्हेरिफाईड आहे. या व्हिडिओत एक परदेशी व्यक्ती असून तो पर्यटक असल्याचे दिसते.

पर्यटक व्हिडिओ ब्लॉगिंग करताना गोव्यातील एका बाजारपेठेत जातो. तेथे एका हॉटेलमध्ये काही लोकं पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा क्रिकेट सामना पाहत आहेत. दरम्यान हा व्यक्ती तुम्ही न्युझीलंड टीमला सपोर्ट करत आहात का? असा प्रश्न विचारतो त्यावर तो व्यक्ती नाही आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतोय असे उत्तर देतो. त्यावर तो का? असे विचारतो तर, 'हा मुस्लिम भाग आहे म्हणून' असे उत्तर तो हॉटेल मालक देतो.

दरम्यान, हा व्हिडिओत दाखवण्यात आलेला भाग कोणता आहे याची अधिक माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान व्हिडिओ शेअर करणा-या अतुल नावाच्या व्यक्तीने मुस्लिम भागात राहातात म्हणून गोव्यातील मुस्लिम बांधव पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला (Pakistan Cricket Team) सपोर्ट करत आहेत. सगळीकडे स्लिपर सेल आहेत. असे कॅप्शन त्याने या व्हिडिओ दिले आहे.

तसेच आपल्या ट्विटर बायोमध्ये बंगळुरू, गोवा (Goa) लिहणाऱ्या एका व्यक्तीने हाच व्हिडिओ पुन्हा ट्विट केला आहे. 'गोव्यात देखील अशा घटना घडतात माहित नव्हते,' असे या व्यक्तीने म्हटले आहे.

व्हिडिओची सत्यता काय??

जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एक दिवसीय सामना झाला होता. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या टीव्ही मध्ये देखील उभय देशातील एक दिवसीय क्रिकेट सामनाच सुरू असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ देखील त्याच दरम्यानचा असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या व्हिडिओ ब्लॉगरचे नाव कळू शकले नाही. व्हिडिओची केवळ शॉर्ट क्लिप असल्याने याबाबत अधिक पुष्टी करण्यास व जागेची माहिती मिळण्यास अडचण येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT