Minister Milind Naik Case

 

Dainik Gomantak 

गोवा

.. अखेर 'सेक्स स्कँडल' प्रकरणातील ती महिला गोवा पोलिसांसमोर हजर

बिहारमध्ये दाखल झालेली तक्रार नंतर मुरगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून, मुरगाव पोलीस तिचा जबाब नोंदवणार आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी मंत्री मिलिंद नाईक (Minister Milind Naik Case) यांच्याशी निगडित असलेल्या कथित सेक्स स्कँडलमधील पीडित महिला आज मुरगाव पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. सेक्स स्कँडलमध्ये तिचे नाव आल्याने तिने काँग्रेस नेते संकल्प आमोणकर आणि इतरांविरुद्ध अपहरण आणि खंडणीची तक्रार दाखल केली आहे. बिहारमध्ये दाखल झालेली तक्रार नंतर मुरगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून, मुरगाव पोलीस तिचा जबाब नोंदवणार आहेत तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तक्रारीत नमूद केलेल्या घटनांची पडताळणी केली जाणार आहे.

परिणामी मुरगाव येथील वासनाकांड प्रकरणाचे पर्यावसन नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांना राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेसचे (Congress) संकल्प आमोणकर यांनी या प्रकरणा संबंधीत ध्वनिफिती, चित्रफिती व व्‍हॉट्‌सॲप संदेशांच्या पुराव्यांसह मंत्री नाईक यांच्या विरोधात पोलिस तक्रार (Police) दाखल केली होती. यानंतर विलक्षण गतीने राजकीय चक्रे फिरू लागली. हे प्रकरण कुजत ठेवले तर भाजपाला येत्या निवडणुकीत (Goa Assembly Election) जबर किंमत मोजावी लागेल याचा अंदाज पक्षश्रेष्ठींना आला आणि नाईक यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या गेल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News: मुस्लिम पती, 5 मुलं अन् 45 वय; आता 26 वर्षांनी लहान हिंदू प्रियकरासोबत मंदिरात थाटला संसार! 'सीमा'ची अजब प्रेम कहाणी

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

SCROLL FOR NEXT