पणजी: राजभवनात उभारण्यात आलेला नवीन दरबार हॉलचे उद्घाटन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 4 मार्च रोजी होणार आहे. या हॉलची आसन क्षमता 1000 असून याच्या बांधणीला 7 कोटी रुपये खर्च आला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसर, 10 मार्चनंतर स्थापन होणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ नवीन दरबार हॉलमध्ये होऊ शकतो. राज्य सरकारने (State Government) दरबार हॉलसाठी खर्च केलेल्या 7 कोटींपैकी 4.5 कोटी रुपये बांधकामासाठी वापरण्यात आले, तर उर्वरीत रक्कम ही अंतर्गत सजावटीसाठी खर्च करण्यात आली आहे.
जुन्या दरबार हॉलमध्ये केवळ 150 लोकांच्या बसण्याची सोय होती. या जागेच्या मर्यादेमुळे राजभवनाच्या (Raj Bhavan) लॉनवर लोकांना बसण्यासाठी मांडव उभा करावा लागत होता. यासाठी अतिरिक्त खर्च होत होता. तो आता होणार नाही.
उपराष्ट्रपतींचा गोवा दौरा
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू 3 आणि 4 मार्च रोजी दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यानिमित्त गोव्याला (Goa) भेट देणार आहेत. ते 3 मार्च रोजी गोव्यात येतील आणि 4 मार्च रोजी येथून रवाना होतील. त्यांच्यासोबत पत्नी एम. उषा गोव्याला भेट देणार आहेत. या दौऱ्यात उपराष्ट्रपती नायडू हे दोनापावला येथील राजभवनातील दरबार सभागृहाचे उदघाटन करणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.