Important Instrument in Indian Music Dainik Gomantak
गोवा

संजीवन संगीत अकादमीत 'सारंगी' वादनाचे पुनःरूज्जीवन

भारतीय संगीतातील एक फार महत्वाचे वाद्य आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संगीतातील (Indian Music) एक फार महत्वाचे  वाद्य आहे. हे वाद्य सतराव्या शतकाच्या मध्यात  लोकसंगीतामध्ये  साथीसाठी वाजविले जाणारे वाद्य नंतर हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीताचा अतिशय महत्वाचा भाग बनले. या वाद्यामध्ये (instrument) असणारी आवाजाची लवचिकता, अमर्याद सांगितिक शैली, विविध स्वरांची निर्मिती आणि भावनांतील सूक्ष्म फरक दाखविणारी छटा यांमुळे सारंगीला 'शतरंगी' असेही म्हटले जाते.

सारंगीमध्ये भावनिक अभिव्यक्तीबरोबरच मानवी आवाजाचे स्वरभेद आणि पोत यांचे अनुकरण करण्याची गूढ क्षमता आहे. प्रसिद्ध संगीतकार सर येहुदी मेनूद्दीन म्हणतात की, सारंगी ही विश्वासार्हता, उत्साह आणि भारतीय मूळ तंतुवाद्य एवढ्यापुरतीच मर्यादित राहत नसून, ती भारतीय भावनांचा आणि विचारांचा आदर्श नमुना सादर करते. गायकाच्या आवाजाशी तंतोतंत मिळणारं व आलाप, तान, मींड या सारखे सर्व प्रकार हुबेहूब काढता येणारं वाद्य म्हणून सारंगीची ख्याती आहे. त्याचबरोबर सारंगी हे वाद्य करूण रसाने भरलेलं आहे असं समजलं जातं. मराठी नाटकांच्या वैभवाच्या काळात सारंगीने आपले बहुमुल्य योगदान नाट्यसंगीतासाठी दिलेले आहे.

कला संगीताच्या उत्क्रांती व संवर्धनासाठी जे प्रयत्न सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून केले जातात त्यात सारंगीचे स्थान फार अपवादानेच असते. अनेक सारंगी वादकानी सारंगीवादन सोडून दिले व उपजीविकेसाठी इतर वाद्यांचा आधार घेतला. सारंगीवादक आपली कला आपल्या मुलांना शिकवताना दिसत नाहीत. मध्यमवर्गिय शिक्षित मुले छंद म्हणून याकडे पाहतात. एकेकाळी गोव्यातही बरेच सारंगी वादक होते. संगीत मैफलीत व संगीत नाटकात गोव्यात तबला आणि सारंगी वादनाची साथ असायची. परंतु काळाच्या ओघात सारंगी वादक कमी होत गेले व आजच्या घडीला गोव्यात एकही सारंगी वादक नाहीत. तसे बघायला गेले तर सारंगी वादन लुप्त होत चाललेली कला, असं समजलं जातं. भारतभर अगदी मोजके सारंगी वादक सध्या आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूला अभिजात अशा स्वरुपाच्या या वाद्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही दिसते. पणजीच्या ‘स्वस्तिक’ या संस्थेने आपल्या ‘संजीवन संगीत अकादमी’त सारंगी वादनाचे गोव्यात पुनःरूज्जीवन, हा एक प्रकल्प सुरू केलेला आहे व गेली तीन वर्षे तो यशस्वीरीत्या राबविला जात आहे. मध्यंतरी कोरोनामुळे त्याच्यात थोडा खंड पडला तरी आता त्याला नवी उभारी येत आहे. ग्वाल्हेर येथील तरूण सारंगी वादक वासीम खाँ हे या अकादमीत सारंगी वादनाचे धडे देत आहेत. येत्या पाच वर्षात किमान ४ तरी सारंगीवादक गोव्यात तयार करायचा या संस्थेचा मानस आहे. सारंगीसारख्या वाद्याला पुनर्जीवीत करण्यासाठी स्वस्तिक संस्थेने हे पाऊल उचललेले आहे. सध्या गोव्यातील काही विद्यार्थी सारंगी वादनाचे शास्त्रीय शिक्षण घेत आहेत. संजीवन अकादमीच्या सारंगी वर्गात कुणी विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित असल्यास हीच संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT