Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 24 तासांत चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, आसाममधील आरोपी जेरबंद, 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

Cortalim Theft: वेर्णा पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत घरफोडीचा गंभीर गुन्हा उकलत मोठे यश मिळवले आहे.

Sameer Amunekar

वेर्णा : वेर्णा पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत घरफोडीचा पर्दाफाश करत मोठं यश मिळवलं आहे. या कारवाईत प्रशांत सोनार (३५) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १.३० लाख रुपयांचा चोरीस गेलेला संपूर्ण सोन्याचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुठ्ठाळी येथील गगन बारिक यांच्या घरातून सोन्याची साखळी, कानातले आणि लॉकेट असा ऐवज चोरीस गेला होता. घटनेची तक्रार मिळताच वेर्णा पोलिसांनी तपासाला गती दिली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपी प्रशांत सोनार याच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली.

प्रशांत सोनार हा मूळचा आसामचा रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी तांत्रिक माहिती, गुप्त तपास आणि पथकाच्या सततच्या हालचालींमुळे आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. अटकेनंतर त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच तपास पथकाने मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या वेगवान आणि काटेकोर तपासामुळे २४ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आला. चोरीचा सर्व माल सुरक्षित परत मिळाल्याने गगन बारिक यांना दिलासा मिळाला आहे. वेर्णा पोलिसांची ही यशस्वी कामगिरी स्थानिक नागरिकांनी कौतुकास्पद असल्याचे म्हटलंय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT