Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: 'ती' कार कुणाची? गूढ वाढले; वेर्णा, नुवे, पर्रा चोरी प्रकरणांत एकच गाडी सीसीटीव्‍हीत कैद, पोलिसांसमोर आव्‍हान

Goa Theft Case: ख्रिसमसाच्या मिडनाईट प्रार्थनेसाठी गेल्याची संधी हेरून फर्स्ट दांडो-नावेली येथे एका घरात चोरी करून दोन लाखांचा ऐवज पळविण्‍यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: रविवारी (ता.११) सकाळी ८ वा.च्‍या सुमारास नुवे येथे चोरीची घटना घडली. घरातील मंडळी रविवारच्या प्रार्थना सभेला गेल्‍याची संधी साधून चोरट्यांनी घरात शिरून सुवर्णालंकार व रोकड मिळून तीन लाख दहा हजारांचा ऐवज पळविला. याप्रकरणी सँड्रा गुदिन्हो यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, ख्रिसमसाच्या मिडनाईट प्रार्थनेसाठी गेल्याची संधी हेरून फर्स्ट दांडो-नावेली येथे एका घरात चोरी करून दोन लाखांचा ऐवज पळविण्‍यात आला होता. याप्रकरणी नेन्‍सी फर्नांडिस यांनी मडगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

अजूनही या प्रकरणाचा माग लागू शकला नाही. तर, दोन दिवसांपूर्वी मडगावात मार्था मीरा या वृद्ध महिलेची भरदुपारी चोरट्याने ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. या चोऱ्यांबाबत बोलताना फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, हे सरकारचे अपयश आहे. गस्त नाही, सुरक्षा नाही आणि कोणतीही जबाबदारी नाही. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ राखण्याचा सरकारचा दावा आता पूर्णपणे उघडा पडला आहे.

तीन चोरी प्रकरणांत एकाच कारचा धागा

राज्‍यात चोरट्यांनी उच्‍छाद मांडला आहे. वेर्णा, नुवे येथे चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पर्रा-म्‍हापसा येथेही चोरीचा प्रयत्‍न झाला. विशेष म्‍हणजे या तिन्‍ही ठिकाणी संशयितांची एकच कार सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्‍यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्‍हान उभे ठाकले आहे.

शनिवारी सायंकाळी सहा ते सव्वासातच्‍या दरम्‍यान दांडो-वेर्णा येथील मारिया मेंडिस यांचे घर फोडून चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याच दिवशी दुसरी घटना रात्री साडेदहाच्‍या सुमारास पर्रा-म्‍हापसा येथे घडली. पण चोरट्यांचा प्रयत्‍न फसला. तिसरी घटना दुसऱ्या दिवशी म्‍हणजे काल रविवारी सकाळी आठच्‍या सुमारास नुवे येथे घडली. घरातील मंडळी रविवारच्या प्रार्थना सभेला गेल्‍याची संधी साधून चोरट्यांनी घरात शिरून सुवर्णालंकार व रोकड मिळून तीन लाख दहा हजारांचा ऐवज पळविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT