Verna Garbage Problem Dainik Gomantak
गोवा

औद्योगिक कचऱ्याप्रकरणी वेर्णा नागरिक त्रस्त; रास्ता रोकोचा इशारा

संबंधितांनी दखल घेऊन कारवाई करावी

दैनिक गोमन्तक

वेर्णा (Verna) औद्योगिक वसाहतीलगतच्या कोमुनिदादच्या जमिनीवर औद्योगिक कचरा जाळण्यात येत असल्याने तसेच टाकाऊ साहित्य तेथे टाकण्यात येत असल्याने केसरव्हाळ येथील स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा जाळण्यात येत असल्याने आसपासच्या वस्तीमध्ये धूर पसरून त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकणी योग्य ती दखल घेण्यात आली नाही तर वेळप्रसंगी रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला.

कोमुनिदादच्या मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यात आल्यावर त्याला आग लावण्यात येते. या आगीमुळे तयार झालेला धूर जवळपासच्या वस्तीमध्ये पसरतो. आरोग्याला घातक असलेल्या धुरामुळे स्थानिक त्रस्त झाले आहेत. या धुराचा परिणाम लहान मुलांवर तसेच वृध्दांच्या प्रकृतीवर होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. कचरा (Garbage) जाळण्यात येत असल्याप्रकरणी यापूर्वी वेर्णा पोलिस स्थानकामध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी एका कंपनीने तेथे कचरा टाकला असल्याचे मान्य केले होते. मात्र तेथे कचरा टाकून आगी लावण्याचे प्रकार कमी झाले नाहीत.

अलिकडेच तेथे औद्योगिक कचरयाला लावण्यात आलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्याची पाळी आली असल्याचे काही युवकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी आग लावण्यात आलेल्या कचऱ्याची आग दिवसभर धुमसत असते. असाही दावा युवकांनी केला. तेथे मोठ्या प्रमाणात टाकाऊ साहित्यही टाकण्यात येते. याप्रकरणी ग्रामपंचायतीला तक्रार करण्यात आली आहे. संबंधितांनी दखल घेऊन कारवाई करावी व स्थानिक रहिवाशांची त्रासापासून सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT