Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

"आम्ही मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक"; अपघातानंतर धमकी देणाऱ्या दोघांना अटक!

दैनिक गोमन्तक

वेर्ला-काणका येथे अपघातानंतर फिर्यादींसह त्यांच्या पत्नी व मुलाला शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी धमकी व विनयभंगाच्या आरोपाखाली संशयित केदार जगदाळे देसाई (मडगाव) व अल्बिनो फर्नांडिस (धरर्मापूर, नावेली) यांना अटक केली.

हा अपघात रविवारी रात्री ८.२५ च्या सुमारास वेर्ला-काणका येथे लोटलीकर बारजवळ घडला. फिर्यादी जितेंद्र नथानी (सुकूर, पर्वरी) हे आपली पत्नी व मुलासमवेत जीए ०३ वाय १०५७ या कारने काणका ते हणजूणच्या दिशेने जात होते.

तर संशयित आरोपी समोरून (पीवाय ०५ एफ ९६००) कारने भरधाव येत होते. घटनास्थळी संशयिताने निष्काळजीपणे वाहन हाकून फिर्यादींच्या कारला धडक दिली. या अपघातानंतर फिर्यादी जितेंद्र नथानी हे गाडीतून उतरले व त्यांनी संशयितांना काही जखम झाली नाही ना, याची विचारपूस केली. त्यावेळी संशयितच फिर्यादींना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. शिवाय संशयितांनी फिर्यादींच्या पत्नी व मुलालाही शिवीगाळ केली.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघाही संशयितांना रितसर अटक केली, नंतर त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक ?

संशयित केदार देसाई याने पोलिसांनाही आपण मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असल्याचे सांगून दमदाटी देण्याचा प्रयत्न केला.दोघेही संशयित कथित नशेत होते. दरम्यान, संशयित हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक नसून मुख्यमंत्र्यांच्या एका नातेवाईकांच्या शेजारी ते राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

SCROLL FOR NEXT