Venzy Viegas on plastic rice sold in benaulim retail shop Dainik Gomantak
गोवा

आधी सडलेले, आता रास्त भाव दुकानांतर्फे दिले जातायत चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ! आमदार वेंझी व्हिएगस यांनी केली चौकशीची मागणी

रास्त भाव दुकानांतर्फे भेसळयुक्त तांदूळ पुरवठा केला जात असल्याचा खुलासा

दैनिक गोमन्तक

गोव्यात सध्या सडलेले धन्य वाटप करण्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. यातच आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाणावली आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी रास्त भाव दुकानांतर्फे भेसळयुक्त तांदूळ पुरवठा केला जात असल्याचा खुलासा केला आहे.

गोन्साल्विस नावाच्या महिलेने वेंझी यांची त्यांच्या आमदार कार्यालयात भेट घेऊन बाणावलीतील रास्त भाव दुकानातून खरेदी केलेला तांदूळ भेसळयुक्त असल्याची माहिती दिली.

तांदूळ खरेदी करून घरी नेल्यावर तो नीट शिजत नसून पाण्यात तरंगत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती वेंझीना दिली. त्यावेळी वेंझी यांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि बाणावलीतील रास्त भाव दुकानात काही प्रमाणात प्लास्टिक तांदूळ घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला.

माध्यमांसाठी त्यांनी सामान्य तांदूळ आणि भेसळयुक्त तांदूळ पाण्यात कसे दिसतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर प्लॅस्टिक असल्याचा आरोप असलेल्या तांदळाचे दाणे जाळले आणि त्याचा चुरा केला. यावरून ते तांदळाचे दाणे नसून प्लॅस्टिक असल्याचे सिद्ध झाले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच मुख्यमंत्री, नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक आणि दक्षता विभागाला ईमेल करून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे आणि मंगळवारी अधिकृत तक्रार करणार करणार असल्याचे सांगितले.

ते पुढे असेही म्हणाले की ते एफडीए प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणि दोन इतर नमुने दोन खाजगी प्रयोगशाळेत त्यांच्या अहवालासाठी पाठवणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT