Mormugao Garbage Issue  Dainik Gomantak
गोवा

Mormugao: मुरगाव पालिकेवर ‘कचऱ्या’चा भार! विक्रेते बुडवतात शुल्क; रस्त्यालगत अस्वच्छतेचे साम्राज्य

Mormugao Waste Management: विक्रेते रस्त्याकडेला कुजलेली भाजी, फळे व इतर वस्तू बिनधास्तपणे टाकतात. त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न करता, मुरगाव पालिका हा कचरा उचलते.

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Vendors Garbage Issue

वास्को: विक्रेते रस्त्याकडेला कुजलेली भाजी, फळे व इतर वस्तू बिनधास्तपणे टाकतात. त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न करता, मुरगाव पालिका हा कचरा उचलते.

हे विक्रेते स्वच्छतेसंबंधी कोणतेही शुल्क मुरगाव पालिकेला देत नसल्याने पालिकेचा महिन्याकाठी ९० हजारांपेक्षा अधिक महसूल बुडतो. तो वसूल करण्यासाठी मुरगाव पालिका कोणतीही कृती करीत नसल्याने यामागे कोणते अर्थकारण आहे, यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकार देते; परंतु प्रत्यक्षात मुरगाव पालिका कोणतीही कारवाई न करता कचरा उचलते, हे न सुटणारे गणित आहे. एकीकडे मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी करणारी मुरगाव पालिका हे स्वच्छता शुल्क गोळा करण्याची मोहीम सुरू करेल काय, हा मोठा प्रश्न आहे.

शहर भागातील भाजी मार्केटात भाजी, फळे, किराणा माल, नारळ तसेच इतर माल विकणारे विक्रेते आहेत. हे विक्रेते पूर्वी आपला कचरा, कुजलेली भाजी, फळे तसेच इतर वस्तू तेथील पोस्ट कार्यालयालगतच्या मोकळ्या जागेत टाकत होते. तेथे पालिकेचा मोठा कचरावाहू ट्रक येऊन तो सर्व कचरा नेत असे. मात्र, आता चित्र वेगळे दिसते.

विक्रेत्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने तेथून लहान रिक्षाही आत जाणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे कचरा गोळा करण्यासाठी ट्रक आत नेता येत नाही. त्यामुळे तेथे कचरा साठून राहू लागला होता. त्यातून मार्ग काढताना विक्रेत्यांनी सर्व कचरा एफ.एल. गोम्स मार्गावरील गोवा बागायतदार संस्थेलगतच्या रस्त्यावरच टाकण्यास आरंभ केला. त्याला मुरगाव पालिकेनेही मान्यता दिली. तेथील

जागा ही दुचाकी वाहने उभी करण्यासाठी आहे. तेथे कचरा टाकण्यात येत असल्याने काहीजण त्या कचऱ्यामध्येच वाहने उभी करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT