Velsao protesters Dainik Gomantak
गोवा

Velsao : पाहणी शिवाय काम सुरु केल्यास खबरदार; वेळसांव आंदोलकांचा इशारा

खासगी जागेत रेल्वे विकास निगम अतिक्रमण करीत असल्याचा स्थानिकांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Velsao : वेळसांव येथे रेल्वे विकास निगम खासगी मालमत्तेत अतिक्रमण करून काम करते, असा आरोप करून स्थानिकांनी काम बंद पाडल्यावर आज त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी देऊनही ते त्या ठिकाणी फिरकलेच नाहीत. त्यामुळे खवळलेल्या आंदोलकांनी जोपर्यंत उपजिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करत नाहीत, तोपर्यंत रेल्वेला कुठलेही काम करू देणार नाही आणि त्यांनी बळजबरीने ते करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी कायदाही हाती घेऊ, असा इशारा दिला.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांनी आपण वेळसांव येथे येऊन पाहणी करू, असे सांगितले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि आंदोलक उपस्थित झाले होते. कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा तसेच काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, कॅ. व्हिरीयातो फर्नांडिस, ओलेन्सियो सिमोईस हे उपस्थित होते. दुपारी २ वाजून गेले तरी निपाणीकर तिथे फिरकले नाहीत, त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला.

अदानीचा कोळसा वाहून नेण्यासाठी रेल्वेला या मार्गाचे लवकरात लवकर दुपदरीकरण करायचे आहे. या कोळशासाठी सरकार स्थानिकांचा बळी देत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारवर केला.

Velsao protesters

रेल्वे खासगी जमिनीत अतिक्रमण करत आहे. उपजिल्हाधिकारी गावच्या लोकांना संरक्षण देण्याऐवजी रेल्वेच्या बेकायदेशीर कामाला पाठिंबा देत आहेत असा आरोप माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी केला आहे.

निपाणीकर यांचा वापर करून घेऊन सरकारने पेडणे येथे लोकांच्या जमिनी बळजबरीने आपल्या ताब्यात घेतल्या. आता या रेल्वे मार्ग विस्तारासाठी अशाच प्रकारची बळजबरी करायची आहे. त्यासाठी त्यांनी निपाणीकर यांना मुरगाव येथे पाठविले असून जे पेडणे येथे त्यांनी केले तेच ते आता त्यांना येथे करायचे आहे, असा आरोप कॅ. फर्नांडिस यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT