Velsao Railway Track Protest Dainik Gomantak
गोवा

Velsao: सरपंचांना 'तुम्ही कोण?' म्हणल्याने वेळसावात तणाव, रेल्वे ट्रॅकवरून गोंधळ कायम; बंदी आदेशात काम सुरु केल्याने चिघळला वाद

Velsao Railway Track Doubling Dispute: वेळसाव पंचायतीने रेल्वे दुपदरीकरणाचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिला असतानाही तेथे काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Velsao Railway Track Dispute

वास्को: वेळसाव पंचायतीने रेल्वे दुपदरीकरणाचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिला असतानाही शुक्रवारी (ता.७) रेल्वे विकास निगमच्या उपव्यवस्थापकाने कामगारांसह तेथे पुन्हा काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.

रेल्वे विकास निगमच्या उपव्यवस्थापकाने सरपंच डायना गौवेआ यांना तुम्ही कोण, असा प्रश्र्न विचारल्याने तणावामध्ये भर पडली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने त्या उपव्यवस्थापकाला तेथून दूर नेल्याने परिस्थिती चिघळली नाही.

तेथील मालकी हक्कासंबंधी योग्य कागदपत्रे सादर करा. तोपर्यंत काम बंद ठेवा, असा आदेश वेळसाव पंचायतीने रेल्वे विकास निगमला दिला आहे. यासंबंधी एक संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी सरपंच डायना यांनी तुम्ही आम्हाला योग्य कागदपत्रे, आराखडा द्या आम्ही संबंधित जमीनमालकांकडे बोलतो व त्यातून तोडगा काढता येतो का ते पाहू, असे सांगितले होते. त्यानंतर गेले काही दिवस काम बंद होते. मात्र, शुक्रवारी तेथे पुन्हा काम करण्यास कामगार आल्याने गावकरी जमले. त्यांनी काम करण्यास हरकत घेतली.

यावेळी तेथे सरपंच डायनाही पोहोचल्या. त्यांनी पंचायतीने काम बंद करण्याचा आदेश दिला असतानाही तुम्ही काम कसे सुरू करता असे विचारले. तेव्हा आम्हाला पंचायतीचे काही देणेघेणे नाही, असे प्रत्युत्तर त्या उपव्यवस्थापकाने दिले. त्‍यामुळे वाद उफाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT