Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कर्नाटकातून गाडी चोरणाऱ्यांना गोवा पोलिसांकडून अटक

कर्नाटकातून टाटा एस पिकअप हे वाहन चोरून आणताना कुळे पोलिसांनी एका चोरट्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमन्तक

Goa Police: कर्नाटकातून टाटा एस पिकअप हे वाहन चोरून आणताना कुळे पोलिसांनी पकडले आणि चालक अनंत (30, रा. नीलानगर-म्हैसूर) याला ताब्यात घेतले.

कुळेचे पोलिस निरीक्षक संजय दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक अजय धुरी कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असताना कर्नाटक परिसरातील अनमोड घाट येथे टाटा नेक्‍सॉन कार (एमएच 02 एफआर 7996) आणि टाटा पिकअप (केए 17 डी 8907) यांच्यात हिट अँड रन प्रकरण घडले. ही पिकअप मोलेच्‍या दिशेने येत होती.

उपनिरीक्षक धुरी अपघातग्रस्‍त टाटा पिकअपवर लक्ष ठेवून होते. जेव्‍हा ती आली, तेव्‍हा त्‍यांनी ती थांबविण्यासाठी हात दाखविला. पण पिकअप थांबली नाही.

त्यानंतर पाठलाग करून पिकअपला पकडले व चालकासह वाहन मोले आऊट पोस्टवर आणले. तेव्हा याच पिकअपने टाटा नेक्सॉन कारला रामनगर पोलिसांच्या हद्दीत धडक दिल्याची पुष्टी झाली.

त्यानंतर अधिक चौकशी केली असता सदर पिकअप 29 जानेवारी रोजी बागलकोट येथून चोरीला गेल्याची माहिती कळली. दरम्‍यान, सर्व सोपस्कार पूर्ण करून वाहनचालक चालक अनंत याला बागलकोट पोलिसांच्या ताब्यात देण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT