Vegetable Price Hike Dainik Gomantak
गोवा

Vegetables Price Hike : महागाईचा भडका, भाज्यांचे दर चढेच; आवक कमी

Vegetables Price : या महागाईच्या भडक्याचा फटका सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे. राज्यात कांद्या, बटाट्यासहित सर्वच भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यात मागील महिन्यापासून फळभाज्या, पालेभाज्यांच्‍या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या महागाईच्या भडक्याचा फटका सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे. राज्यात कांद्या, बटाट्यासहित सर्वच भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बेळगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे भाजीची नासाडी झाली आहे. भाजीची शेती पाण्याखाली गेली आहे.

गेल्या महिन्यात ४० रुपये किलो दराने विकले जाणारे कांदे, बटाटे ५० रुपये किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटो पणजी बाजारात ८० रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत. वालपापडीचे दर २६० रुपये प्रती किलो होते परंतु वालपापडीच्या दरात घट झाली असून १६० रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे.

बेळगावात भाजीची आवक कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात दर वाढले आहेत. पुढील महिनाभर वाढलेलेच राहण्याची शक्यता विक्रेते व्यक्त करत

आहेत.

आले आणि लसणाचे दर मागील महिन्यापासून वाढलेलेच आहेत. मध्यम आकाराचा लसूण बाजारात ३६० रुपये किलो आहे तर आले २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. सध्या पावसाळ्यात आल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु आल्याचे दर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहेत.

बाजारभाव

बाजारभाव

भाजी फलोत्पादन बाजारातील

महामंडळ दर

कांदा ४१ ५०

बटाटा ४० ५०

टॉमेटो ६४ ८०

कोबी ४० ४०

फूल कोबी ४५ ४५

भेंडी ५८ ८०

गाजर ४३ ८०

वालपापडी ७३ १६०

हिरवी मिरची ७२ १००.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT