Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: 'खनिज वाहतुकी'चा चेंडू न्यायालयाच्या कोर्टात! सुनावणीनंतर ठरणार भवितव्य, ट्रकमालकांसह कामगारांचे लक्ष

Bicholim Mining: ‘वेदांता’ खाणीवरील खनिजप्रश्नी पुढील सुनावणीकडे पिळगाववासीयांसह खाणीवर अवलंबून असलेले कामगार आणि ट्रकमालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sameer Panditrao

Vedanta Mining Transport Issue Goa Bicholim

डिचोली: ‘वेदांता’ खाणीवरील खनिजप्रश्नी पुढील सुनावणीकडे पिळगाववासीयांसह खाणीवर अवलंबून असलेले कामगार आणि ट्रकमालकांचे लक्ष लागून राहिले आहे. पिळगावच्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या सोमवारी (ता. २०) होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावरच ‘वेदांता’च्या खनिज वाहतुकीचे भवितव्य निश्चित होणार आहे.

खाणीवरून रात्रीची खनिज वाहतूक सध्या बंद असली, तरी दुसऱ्या मार्गाने दिवसा वाहतूक सुरू आहे. आजही (मंगळवारी) सकाळी ते सायंकाळपर्यंत खनिज वाहतूक सुरू होती. खाणीवरील रस्ता अडवल्याने खाण खात्याने दिलेल्या परवानगीनुसार ‘वेदांता’कडून सार्वजनिक रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, या रस्त्याने वाहतूक करण्यास पिळगाववासीयांची हरकत आहे. पर्यावरणीय दाखल्यात (ईसी) नोंद आहे, त्या नियमांचे पालन करूनच खनिज वाहतूक करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

‘वेदांता’ खाणीवरून रात्रपाळीत खनिज वाहतूक करण्यात येत होती. मात्र, ट्रकांची धडधड आणि हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे मनःस्ताप होताना रात्रीचा धड डोळाही लागत नाही असा दावा करीत मध्यरात्री ते पहाटेपर्यंत होणाऱ्या खनिज वाहतुकीस पिळगाववासीयांनी विरोध केला. बारा दिवसांपूर्वी (ता. २) मध्यरात्रीच संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक रोखून धरली.

तेव्हापासून रात्रीची खनिज वाहतूक बंद आहे. मध्यंतरी रात्रपाळी बंद करून खनिज वाहतुकीसाठी रात्री दहा वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावी असा प्रस्ताव ट्रकमालक संघटनेने दिला आहे. मात्र, या प्रस्तावालाही विरोध करताना काळोखात खनिज वाहतूक नकोच अशी भूमिका पिळगावच्या लोकांनी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT