Goa Mining Problems Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining: 'आमचे ट्रक घ्या आणि पोटापाण्याची व्यवस्था करा'! डिचोलीतील ट्रकमालकांची आर्त विनवणी

Bicholim Truck Owners: ‘वेदांता’च्या खनिज वाहतुकीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालक सध्या चिंतेत पडले आहेत. जवळपास बारा वर्षांच्या खाणबंदीमुळे बहुतेक ट्रकमालकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Mining Truck Owners Problems

डिचोली: खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर पडून आमचे भवितव्य उद्‌ध्वस्त होणार आहे, अशी भीती डिचोलीतील ट्रकमालकांनी व्यक्त करून खनिज वाहतुकीला विरोध करणाऱ्यांनी आमच्या भवितव्याचा विचार करावा, अशी मागणी केली आहे.

खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली नाही, तर आमच्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होणार असून, वेळप्रसंगी टोकाचे पाऊलही उचलण्याची वेळ येणार, अशी भीती उदेश मांद्रेकर, महेश्वर पेडणेकर, प्रकाश नाईक आणि अन्य ट्रकमालकांनी व्यक्त केली आहे.

‘वेदांता’च्या खनिज वाहतुकीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालक सध्या चिंतेत पडले आहेत. आधीच आम्ही आर्थिक संकटाच्या फेऱ्यात गटांगळ्या खात आहोत. त्यातच खनिज वाहतुकीचा मार्ग अनिश्चित बनल्याने भवितव्य अंधःकारमय बनले आहे, अशी व्यथा ट्रकमालक व्यक्त करत आहेत.

खनिज वाहतूक पूर्ववत सुरू झाली नाही, तर सरकाराने आमचे ट्रक घ्यावेत आणि आमच्यासह कुटुंबांच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ट्रकमालकांनी केली आहे. खाणीला विरोध करणाऱ्या रमेश गावस यांनी ट्रकमालकांचाही विचार करावा, अशी मागणी उदेश मांद्रेकर आणि अन्य ट्रकमालकांनी केली आहे.

कर्ज कसे फेडावे?

जवळपास बारा वर्षांच्या खाणबंदीमुळे बहुतेक ट्रकमालकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. आताच कुठे तरी खाण सुरू होऊन काम मिळाले होते. कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रकांची दुरुस्ती करून खनिज वाहतुकीसाठी आम्ही ट्रक रस्त्यावर उतरविले होते.

मात्र, पुन्हा खनिज वाहतूक बंद झाल्याने ट्रकमालकांसमोरील संकट आणखी गडद झाले आहे. काम नाही, तर कर्जाचे हप्ते कसे फेडावेत, ट्रकचालकांना पगार कसा द्यावा, हे प्रश्न आम्हाला सतावू लागले आहेत, असे महेश्वर पेडणेकर आणि प्रकाश नाईक यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT