Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Murder Case: मिळालेल्या माहितीनुसार मैनुद्दीन आणि रबिया यांच्यात वाद चालूच होते. वाद पोलिसांपर्यंत पोचला होता. घटस्फोट घेण्याचेही नवरा-बायकोमध्ये निश्चित झाले होते.

Sameer Panditrao

डिचोली: न्यूवाडा-वाठादेव (डिचोली) येथील खूनप्रकरणी अटक केलेल्या मैनुद्दीन हवांगी या संशयित आरोपीला दहा दिवसांचा पोलिस कोठडीचा रिमांड मंजूर झाला आहे. संशयित आरोपीला (शनिवारी) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलिस रिमांड दिला.

खुनासाठी वापरण्यात आलेली तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. (शुक्रवारी) भरदिवसा न्यूवाडा-रोलिंगमिल येथे भर रस्त्यावर मैनुद्दीन हवांगी याने स्वतःची पत्नी रबिया हिच्यावर तलवारीने सपासप वार करुन निर्दयीपणे खून करण्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर मैनुद्दीन स्वतः पोलिसांना शरण आल्यानंतर डिचोली पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता, उपअधीक्षक व्हील्सन डिसोजा आणि डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या खूनप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

घटस्फोटापूर्वीच हत्या

मिळालेल्या माहितीनुसार मैनुद्दीन आणि रबिया यांच्यात वाद चालूच होते. वाद पोलिसांपर्यंत पोचला होता. घटस्फोट घेण्याचेही नवरा-बायकोमध्ये निश्चित झाले होते. सोपस्कारही जवळपास पूर्ण होऊन कालच सायंकाळी घटस्फोट करारावर स्वाक्षरी होणार होती, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

मात्र घटस्फोट घेण्यापूर्वीच मैनुद्दीन याने पत्नी रबिया हिला यमसदनी पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार मैनुद्दीन याला ‘ड्रग्ज’सेवनाचे व्यसन होते. अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khanapur Elephant Death: संतापजनक! खानापुरात विजेचा शॉक लागून 2 हत्ती ठार, झटका मशीनला वीजवाहिनी जोडल्याने दुर्घटना

Polem Loliem: 4 वर्षांच्या बालकाला अमानुष मारहाण, आईच्या अटकेसाठी पोळेवासीय एकवटले; मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस

Horoscope: अनपेक्षित घटना फायदेशीर, आर्थिक लाभाची शक्यता; संयम ठेवा!

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

SCROLL FOR NEXT