Vasco वास्को गोवा शिपयार्ड बाजूस रस्त्यावर खोदकाम केलेल्या वाहिनीतून वाया जाणारे पाणी. Dainik Gomantak
गोवा

जनतेच्या हक्काचं 'पाणी' चक्क रस्त्यावर वाहतय...

राज्य सरकारने प्रत्येकांच्या घरातील सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या वाहिनीतील पाणी दर महिन्याला सोळा हजार लिटर पाणी मोफत देण्याचे घोषित केले आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: राज्य सरकारने प्रत्येकांच्या घरातील सार्वजनिक बांधकाम पाणी (Water) विभागाच्या वाहिनीतील पाणी दर महिन्याला सोळा हजार लिटर पाणी मोफत देण्याचे घोषित केले आहे. परंतु विभागाच्या हलगर्जीपणामुळे जनतेला मिळणारे पाणी चक्क रस्त्यावर वाहत असल्याचे संपूर्ण गोव्यातून दररोज कुठे ना कुठे नजरेस पडत आहे. वास्को (vasco) गोवा शिपयार्ड बाजूस जायका प्रकल्पाच्या नव्याने बसवलेल्या वहिनिच्या पाण्याचा दाब तपासण्यासाठी विभागातील कामगारांनी रस्त्यावर खोदकाम करून ठेवलेल्या वाहिनीतून गेल्या दोन आठवड्यापासून मध्यरात्री हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जनतेला मिळणाऱ्या पाण्याचा राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम पाणी विभाग कशाप्रकारे दुरुपयोग करीत असल्याची टीका सार्वजनिक नागरिकांकडून स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

गोव्यात दररोज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामामुळे खोदकाम करताना जनतेला मिळणार या सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या पाण्याची नासाडी करीत आहे. मात्र याविषयी संबंधित विभाग खोदकाम करून तोडलेल्या पाण्याची वाहीनी दुरुस्त करण्यास पुढाकार घेत नसल्याने जनतेला पाण्यापासून वंचित राहावे लागते. गेल्यावर्षी चिखली वाडे ते नवेवाडेपर्यंत नवीन जायका प्रकल्पाची पाण्याची वाहिनी बसवण्यात आली होती. कारण नवेवाडे भागातील नागरिकांना पाण्याचा खूपच कमी प्रमाणात तुटवटा होत असल्याने जायका प्रकल्पाच्या पाण्याची वाहिनी बसवण्यात आली होती. पण जायका प्रकल्पाच्या बसवण्यात आलेल्या पाण्याच्या वाहिनीची अजूनही पाण्याच्या दाबाची तपासणी न केल्याने दोन आठवड्यापूर्वी गोवा शिपयार्ड बाजूस रस्त्यावर बांधकाम विभागाच्या कामगारांनी खोदकाम करून ठेवले होते. मात्र अजूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या गतीची पाहणी न केल्याने गेल्या दोन आठवड्यापासून खोदकाम केलेल्या वाहीनीतून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून वाया जात आहे.

वास्को बायणा येथील सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या एकही अधिकाऱ्यांनी येथील वाया जाणाऱ्या पाण्याविषयी गंभीरतेने विचार केलेला नाही. दररोज वाया जाणाऱ्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारतर्फे जनतेला सार्वजनिक बांधकाम पाणी विभागातील वाहिनीतील पाणी दर महिन्याला सोळा हजार लिटर मोफत देणार असे जाहीर केले असल्याने संबंधित विभाग पाण्याची अशाप्रकारे नासाडी करीत आहे. राज्य सरकारने पाण्याचा विषय गंभीरतेने घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश जारी करून रस्ते बांधकाम खोदकाम करताना पाण्याची वाहिनीची काळजी घ्यावी तसेच पाण्याची वाहिनी तोडल्यास संबंधित विभागातर्फे नुकसान केलेल्या वाहिनीची आर्थिक भरपाई करण्याचा आदेश जारी करावा. जनतेला मोफत येणाऱ्या सोळा हजार लिटर पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये यासाठी राज्य सरकारने कडक कायदे संबंधित विभागाला करावे. तेव्हाच पाण्याची नासाडी होणार नाही. वास्को गोवा शिपयार्ड बाजूस रस्त्यावर खोदकाम केलेल्या जायका प्रकल्पाच्या वहिनीची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Narvekar Marathi Controversy: शोक-पस्तावावर खुलासा..!

Football Stars Legs Insurance: मेस्सी-रोनाल्डोच्या पायांची किंमत बड्या कंपन्यांपेक्षाही जास्त, फुटबॉल स्टार्स विमा का काढतात? जाणून घ्या

Pandharpur: दर्शन, चंद्रभागेपासून विठ्ठल चरणांपर्यंत!

Goa Sessions Court: कनिष्ठ न्यायालयाचा 'तो' निर्णय तर्कहीन; कारावासाची शिक्षा केली रद्द, रवींद्रनाथ गावकर दोषमुक्त

Goa IIT Campus: मेळावलीतील जमीन पुन्हा ताब्यात घेणार; 'आयआयटी गोवा' स्थलांतर प्रकल्पावर सरकारकडून पडदा

SCROLL FOR NEXT