Vasco Traffic Police: Dainik Gomantak
गोवा

वास्को वाहतूक पोलीस खात्यातील अधिकारी 40 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

वाहतूक पोलीस निरीक्षक आनंदू राणे व पोलिस उपनिरीक्षक मोहन गावकर 40 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Vasco Traffic Police: वास्को वाहतूक पोलीस खात्यातील वाहतूक पोलीस निरीक्षक आनंदू राणे व पोलिस उपनिरीक्षक मोहन गावकर यांना त्यांच्या वाहतूक पोलिस सेवेत 40 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती देण्यात आली. वाहतूक पोलीस उपनिरीक्षक (Sub Inspector) आनंदू राणे व मोहन गांवकर गेल्या 40 वर्षापासून गोवा पोलिस सेवेत रुजू होते. या काळात त्यांनी आपल्या सेवेत अनेक समाजप्रति सेवा घडविली. मुख्य म्हणजे वाहतूक नियमात सिथीलता तसेच वाहनचालकांमध्ये शिस्तीचे धडे देण्यास त्यांचा मोठा हातखंड आहे. या कार्यकाळात त्यांनी वास्को वाहतूक पोलीस स्थानकातून अनेक वाहतूक पोलीस (Traffic Police) निरीक्षकांच्या हाताखाली उत्कृष्ट सेवा बजावली. यात मुख्यत्वे पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले व सुदेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली उत्कृष्ट सेवा बजावून वाहन चालकांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी सहकार्य केले आहे. Vasco traffic police officer retires after 40 years of service)

दरम्यान योगायोग म्हणजे आज त्यांना त्यांचे माजी पोलीस निरीक्षक ज्यांना आता पोलीस उपअधीक्षक पदी बढती मिळाली आहे ते म्हणजे उपअधीक्षक धर्मेश आंगले व सुदेश नर्वेकर यांच्या उपस्थितीत सेवा निवृत्ती देण्यात आली.

वास्को वाहतूक पोलीस स्थानकात झालेल्या एका छोट्या कार्यक्रमात उपअधीक्षक धर्मेश आंगले व सुदेश नार्वेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी वाहतूक पोलीस कर्मचारी वर्ग उपस्थित होता. उपस्थितांनी पोलिस उपनिरीक्षक मोहन गांवकर व आनंदू राणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT