Railway Dainik Gomantak
गोवा

Vasco Railway Station : वालंकिणी यात्रा वादाच्या भोवऱ्यात; राजकीय नेत्यांकडून मोफत तिकीट दिल्याचा आरोप

Vasco Railway Station : कॉंग्रेसवर विश्र्वास ठेवू नका : मंत्री सिक्वेरा

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Railway Station :

सासष्टी, वास्को रेल्वे स्थानकावरून दर सोमवारी वालंकिणीसाठी ट्रेन सुटते. त्यानुसार सोमवार, ६ मे रोजीसुद्धा वालंकिणीला सायबिणीच्या दर्शनासाठी वास्कोहून ट्रेन सुटणार आहे. ७ मे रोजी गोव्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

त्यामुळे या ट्रेनवरून काही लोकांनी समाजमाध्यमांवर हंगामा सुरू केला आहे. वालंकिणीला जायला काही राजकीय नेत्यांकडून मोफत तिकीट दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वास्को-वालंकिणी ट्रेनला पुष्कळ गर्दी असते. शिवाय ६ मे रोजीच्या ट्रेनसाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच आरक्षण झाले आहे. सुमारे ८०० हून अधिक प्रवाशांचे तिकीट निश्र्चित झाले असून काही प्रवाशांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत.

माजी आमदार ॲड. राधाराव ग्रासियस यांनी समाज माध्यमांवरून, ख्रिस्ती बांधवांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे. मतदान न करणे म्हणजे पाप ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

पर्यावरणमंत्री तथा नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा म्हणाले, या तीर्थयात्रेवरून कॉंग्रेस पक्ष लोकांच्या मनात विष कालवून लोकांची मने कलुषित करीत आहे. कॉंग्रेसच्या अपप्रचारावर विश्र्वास ठेवू नका, असे आवाहन सिक्वेरा यांनी आपल्या वाढदिनी केले आहे.

यात्रा सरकार पुरस्कृत नाही!

समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांच्या म्हणण्यानुसार, सरकारतर्फे ६ मे रोजीची ट्रेन पुरस्कृत केलेली नाही.

६ मे रोजी वास्को, मडगावहून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी निश्र्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कित्येक प्रवासी ट्रेन सुटणार आहेत. मात्र, नेमके याच ट्रेनवरून वादंग का, असा प्रश्र्न उपस्थित केला जात आहे.

या यात्रेला सुमारे हजारभर भाविक जाणार आहेत. मात्र, दक्षिण गोव्याच्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे या ६० हजारहून अधिक मताधिक्याने निवडून येणार असून वालंकिणीला जाणाऱ्या भाविकांमुळे निवडणूक निकालावर काहीच परिणाम होणार नाही.

- आलेक्स सिक्वेरा, पर्यावरणमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT