Vasco Police News  Dainik Gomantak
गोवा

Vasco Police: सव्वा लाखाच्या गांजासह उत्तर प्रदेशच्या तरूणाला अटक

वास्को पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Vasco Police: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका तरूणाला अटक केली आहे. सनी रामशंकर केवट (वय 21 वर्षे) असे या युवकाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याच्याकडून 1.2 ला खरूपये किंमतीचा 1.2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वास्को पोलिसांनी न्यू वाड्डे येथे ही कारवाई केली.

न्यू वाडेतील लोकांकडून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना एलआयबी पथकाला केल्या होत्या. नार्कोटिक्सशी संबंधित कारवाया येथे सुरू होत्या.

गुरूवारी रात्री या भागात गस्त घालत असताना अॅक्टिवा वरून आलेल्या एका युवकाकडे चौकशी केली. त्यावर त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्याचा संशय आल्याने त्याची झडती घेतली गेली. त्यावेळी त्याच्याकडून 1.2 किलो गांजा आढळून आला.

त्याबाबत त्याला काहीही सांगता आले नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात उभे केले गेले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? 'अनफॉलो' आणि पोस्ट डिलीट केल्याच्या चर्चेमागचं नेमकं सत्य काय?

Fake Call Center: पार्टी, नाईटलाईफच्या नादात तरुण बनले गुन्हेगार; गोव्यातील बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, परराज्यातील 50 हून अधिक तरुण ताब्यात

Virat Kohli Golden Duck: किंग इज बॅक... पण शून्यावर! कोहलीकडून 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नकोशा विक्रमीची पुनरावृत्ती

Horoscope: सोमवारी 'या' राशींना लाभणार नशिबाची साथ; महादेवाच्या कृपेने मार्गी लागतील सर्व अडलेली कामे!

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

SCROLL FOR NEXT