Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco:...तर मला अजिबात फोन करू नका; वास्कोच्या आमदारांची नागरिकांना सक्त ताकीद

आमदार साळकर यांनी बुधवारी अपघात प्रवण क्षेत्रातांची पाहणी केली.

Pramod Yadav

गोव्यात अपघातांच्या घटना काही नवी समस्या नाही. दोन दिवसांपूर्वी वास्कोत झालेल्या दुचाकी अपघातात एका महिलेचा हकनाक जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी मुलांचे पालक आणि वाहन मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेवरून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर (Vasco MLA Krushna Salkar) अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहे. बुधवारी साळकर यांनी अपघात प्रवण क्षेत्रातांची पाहणी केली.

अवैध बॅनर आणि होर्डिंग्ज अपघाताचे मुख्य कारण?

अरूंद रस्ते आणि वाहनांची वर्दळ यामुळे वास्को परिसरात वाहनांची गर्दी दिसून येते. पण, रस्त्यात अवैध पद्धतीने उभारण्यात आलेले होर्डिंग्ज तसेच विविध जाहिरातीचे बॅनर अपघाताचे मुख्य कारण ठरत आहे. यासाठी आमदार साळकर यांनी वास्को परिसराची पाहणी केली. यात अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने उभारण्यात आलेले बॅनर हटविण्यात आले.

...तर मला अजिबात फोन करू नका - साळकरांची नागरिकांना ताकीद

वाढते अपघात आणि त्यात मृत्यूमूखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. यावरून वास्को आमदार साळकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. पालकांनी आपल्या मुलांना गाडी चालवण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये तसेच, त्यांच्याकडे वाहन सोपवू नये. असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकरणात किंवा इतर कोणताही गुन्हा घडल्यानंतर मला फोन किंवा मेसेज करू नये अशी सक्त ताकीद त्यांनी नागरिकांना दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT