Vasco Market Dainik Gomantak
गोवा

Vasco Market: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर माटोळी साहित्याने सजले

खरेदीसाठी नागरिकांची एकच झूंबड

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत चतुर्थीला लागणाऱ्या माटोळी बाजाराला आजपासून सुरुवात झाली आहे. माटोळीला लागणारे साहित्य तसेच अन्य आवश्यक जिन्नसानी बाजारपेठ सजली आहे. खरेदीला गर्दी होऊ लागली असून उद्या मंगळवारी लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे. (Vasco market blooms with 'Matoli' on the occasion of Ganesh Chaturthi)

वास्को बाजारात माटोळीचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र मागच्या वर्षीपेक्षा दरात बहुतेक साहित्याचे दर वाढले आहेत. नारळाची पेण 300 ते 800 रुपये, सुपारीचे कात्रे 300 रुपयांपासून सुरुवात केळीच्या शिरत्या पन्नास नग 200 रुपये, केवनीचा दोर 50 ते 100 रुपये, कांगल्या 50 ते 100 रुपये मावळींगे 50 ते 100 रुपये, घागरी 100 रुपये, माटा 40 ते 60 रुपये जोड, तोरिंगण 100 रुपये, अंबाडे पन्नास 100 रुपये, चिबूट 80 रुपये, निरपणस 100 ते 300 रुपये, गौरी चुडी 50 रुपये, हळदीची 25 पाने 50 रुपये, कैऱ्या 100 रुपये एक नग, लाह्या 20 रुपये 100 ग्रॅम असा दर आहे.

दोन वर्षानंतर निर्बंधयुक्त वातावरणात बुधवारपासून (दि. 31) गणेश चतुर्थी आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. माटोळीला लागणाऱ्या साहित्याबरोबर सजावटीसाठी लागणाऱ्या विविध आकाराच्या पताका फुले मकर याच्यासह फटाक्याचे स्टॉलही लागले आहेत. कृत्रिम फुलांचे हार 160 300 रुपये प्रति मीटर दरम्यान आहेत.

गणेश मूर्तीसाठीचे हार 500 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. विद्युत माळा 200 ते 800 रुपये. श्रावण महिना सुरू असल्याने तसेच चतुर्थीच्या काळात भाजी मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला विक्रेत्याकडे गावठी भाजी उपलब्ध आहेत. यात लाल भाजी, मुळा भाजी, चवळीचा पाला, तसेच फळांचे दरही स्थिर आहेत. सफरचंद 120 ते 140 रुपये, सिताफळ 120 रुपये, डाळिंब 160 रुपये संत्री 2500 पेरू 200 रुपये प्रति किलो. तर केळी 60 ते 80 रुपये प्रति डझन दरात उपलब्ध आहे.

बाजारपेठेत वस्तू 30 टक्के महाग झाल्या आहेत. सर्वसामान्यांना त्याची झळ बसलेली आहे. बाजारात रेडिमेट वस्तूंची दुकाने सजावटीचे सामान, लाकडी वस्तू, मखरे आधी विक्रीस उपलब्ध आहे. त्यांचे दर ही 20 ते 25 टक्के वाढलेले आहेत. वास्को बाजारात हळूहळू लोकांची गर्दी वाढलेली दिसत आहे. सजावट साहित्य खरेदीसाठी तसेच माटोळीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी तालुक्यातील विविध भागातील लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

स्वयंपूर्ण बाजार वास्कोत फ्लॉप

दरम्यान सरकारने दहा दिवसांपूर्वी चालू केलेला स्वयंपूर्ण बाजार वास्कोत फ्लॉप शो ठरला. येथील कदम बस स्थानक परिसरात घातलेल्या चतुर्थी बाजाराकडे लोकच फिरकले नसल्याने स्वयंसहाय्य गटांना केलेल्या खर्चावर पाणी फेरावे लागले असे सांगण्यात आले. काहीच नसल्याने काही स्वयंसहायक गटांनी चतुर्थी बाजारात बसणे टाळले. त्यामुळे दहा टक्केच स्टॉल्स या बाजारात दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT