Vasco Kharivada Dainik Gomantak
गोवा

Vasco: मुरगाव पालिकेची धडक कारवाई! अवैध विक्री करणाऱ्यांची मासळी जप्त; वास्को-खारीवाड्यातील प्रकार

Mormugao News: खारीवाडा येथे अवैधरीत्या घाऊक मासेविक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करताना मुरगाव पालिकने काहीजणांची मासळी जप्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Murgao Municipality Action on Vendors

वास्को: खारीवाडा येथे अवैधरीत्या घाऊक मासेविक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करताना मुरगाव पालिकने आज (ता.४) काहीजणांची मासळी जप्त केली. ठिकठिकाणी मासे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस, वाहतूक पोलिस, वाहतूक खात्याचे अधिकारी यांनीसुध्दा कारवाई करावी जेणेकरून अवैधरीत्या मासेविक्री करणाऱ्यांना वचक बसेल, असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी सांगितले.

मुरगाव पालिकेने बायणा येथे रस्त्यावर अतिक्रमण करून मासळी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मुरगाव पालिका खारीवाडा येथील विक्रेत्यांविरोधात कारवाई करते, परंतु बायणातील त्या विक्रेत्यांकडे काणाडोळा करते यामागील गणित कळत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

खारीवाडा येथे घाऊक दराने मासे विक्री होत असल्याने तेथे ग्राहकांची नेहमी गर्दी असते. त्यामुळे शहर भागातील मासे मार्केटात ग्राहक सहसा फिरकत नसल्याने तेथील विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो, असा दावा मार्केटातील मासे विक्रेत्या करतात.

जोपर्यंत खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद होत नाही. तोपर्यंत आम्ही सोपो देणार नाही, असे सांगून मार्केटातील विक्रेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून सोपो देणे बंद केले आहे. त्यामुळे मुरगाव पालिकेला आज खारीवाडा येथील विक्रेत्यांवर कारवाई करणे भाग पडले.

नगराध्यक्ष बोरकर त्या ठिकाणी उपस्थित राहून सूचना करीत होते. त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथे मासे विक्री करणाऱ्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तथापि काही वाहनांमध्ये फक्त बर्फ साठविण्यात आल्याचे दिसून आले. तर एका विक्रेत्याची मासळी जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे तेथे आलेल्या ग्राहकांना माशाविना परतावे लागले.

सहकार्य अपेक्षित

बोरकर म्हणाले, कारवाई केल्यानतर काही दिवसानंतर ते पुन्हा आपल्या व्यवसाय सुरू करतात. पूर्वी काही ठराविक व्यक्ती तेथे मासे विक्री करीत होते. तथापि आता तेथे एक मिनी मासे मार्केटच सुरू झाले आहे. या विक्रेत्यांमुळे वास्को मासे मार्केटातील विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांनी सोपो देण्याचे बंद केले आहे. येथे स्वस्त दरात मासे विकले जात असल्याने ग्राहकांची गर्दी असते. लोकांनी या ठिकाणी मासे विकत न घेता मार्केटातून मासे विकत घेण्याची गरज आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT