Ganesh Chaturthi 2023 Vasco Goa SOP 
गोवा

सुरक्षा रक्षक नेमा, गणेश मंडळाजवळ CCTV बसवा; वास्कोत गणेश चतुर्थीसाठी पोलिसांची नियमावली जाहीर

चतुर्थी शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

Pramod Yadav

Ganesh Chaturthi 2023 Vasco Goa SOP: गणेश चतुर्थीचा (चवथ) सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वास्को पोलिसांनी मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

नियमावलीनुसार, खासगी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यासह मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना मंडळांना करण्यात आली आहे.

वास्को पोलिसांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गणेश मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. चतुर्थी शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच, यावेळी उत्सव काळासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आली.

उत्सवाच्या काळात पोलिसांकडून केवळ रात्रीच्या वेळी सुरक्षा देण्यात येईल. रात्री दहानंतर लाऊडस्पिकर आणि संगीत वाजवता येणार नाही. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाऊडस्पिकरसाठी रितसर परवानगी घेण्याची गरज असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

संशयास्पद कोणतीही व्यक्ती अथवा घटना समोर आल्यास याबाबत पोलिसांना तात्काळ 100 या नंबरवरती संपर्क साधून माहिती द्यावी. असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.

अशी आहे पोलिसांनी नियमावली

1) मंडळासाठी खासगी सुरक्षारक्षकाची नेमणूक करणे, सीसीटीव्ही बसवणे

2) फक्त रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त

3) रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवता येणार नाही

4) साउंड सिस्टिम वापराच्या परवानगीसाठी अर्ज करावा

5) काहीही संशयास्पद आढळून आल्यास 100 नंबरवर पोलिसांना संपर्क साधावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT