Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: डॉक्टर की हैवान! दोन महिने 14 वर्षीय मुलासोबत करत होता लाजीरवाणे कृत्य, पोलिसांनी केली अटक

Vasco Da Gama Goa Crime: प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुलाच्या पालकाने वास्को पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Pramod Yadav

वास्को: चौदा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. सुमारे दोन महिने संशयित डॉक्टर अल्पवयीन मुलासोबत लाजीरवाणे कृत्य करत होता, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयित डॉक्टरला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉ. शमसुद्दीन (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ या काळात डॉक्टर पीडित मुलावर लैंगिक अत्याचार करत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुलाच्या पालकाने वास्को पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शमसुद्दीन पीडित मुलावर दोन महिने निरनिराळ्या वेळी लैंगिक अत्याचार केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी १४ मार्च रोजी शमसुद्दीनला अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वास्को पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: डिचोलीत जिल्हा पंचायत निवडणुक मतदानाला सुरुवात!

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

SCROLL FOR NEXT