Konkan Railway Holi Special Train Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन, पाटणा– वास्को द गामा एक्सप्रेसची घोषणा

Konkan Railway Holi Special Train: कोकण रेल्वे प्रशासनानं होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आलीय.

Sameer Amunekar

Konkan Railway Holi 2025 Special Train

कोकण रेल्वे प्रशासनानं होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को-द-गामा–पटना–वास्को-द-गामा एक्सप्रेस स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या निर्णयामुळं कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.

ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा–पाटणा एक्सप्रेस स्पेशल मंगळवार (तारीख-११/०३/२०२५) रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल. तर तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा–वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार (तारीख १५/०३/२०२५) रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.

Konkan Railway Holi Special Train

या स्थानकांवर थांबणार

ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबणार आहे.

या विशेष ट्रेनच्या वेळापत्रकाची आणि थांब्यांची माहिती संबंधित रेल्वे स्थानकांवर किंवा अधिकृत रेल्वे संकेतस्थळार देखील उपलब्ध आहे.

शिमगा हा कोकणातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असून, या काळात गावाकडील लोक मोठ्या संख्येनं कोकणात गावी येत असतात. रेल्वेच्या निर्णयामुळं कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT