Demand for action Gomantak Digital Team
गोवा

Vasco : मुरगावात जंगलराज : शंकर पोळज भगत यांच्या हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

शंकर पोळजी : भगत यांच्या हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : मुरगाव सडा एफसीआय गोदाम मागे बोगदा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भगत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी भादंस ३०७ कलमाखाली गुन्हा नोंद न केल्याने, या भागातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुरगावातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुरगावात जंगलराज सुरू असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केली.

भगत यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचे भादंस ३०७ कलम न लावल्याने मुरगाव सडा, बोगदा, जेटी व बायणा परिसरातील रहिवाशांनी जेटी येथील श्री कलमदेव खाप्रेश्वर मंदिराकडे एकजूट होऊन मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त केला आहे.

मुरगाव बोगदा येथील समाजकार्यकर्ते सचिन भगत व सडा भागातील शेखर दाभोलकर यांच्यावर गुरुवार (दि.२३) रोजी सडा एफसीआय गोदाम मागे संशयित पवन कोळमकर, ब्रिटो राज, सुरज चोडणकर, ओमकार दुर्भाटकर यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

याप्रकरणी जखमी सचिन भगत यांनी मुरगाव पोलिस स्थानकांत मारहाण करणाऱ्या चारहीजणा विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यातील फक्त ब्रिटो राज याला अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका केली. इतरांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

पत्रकारांशी बोलताना शंकर पोळजी म्हणाले की, सडा परिसरात गुंडगिरीत वाढ झाली असून यात गेली अनेक वर्षे पूर्णपणे बंद असलेले मटका, जुगार तेजीत आहे. सडा बरोबर इतर ठिकाणी सुरू असलेले जुगार व अनैतिक व्यवसाय पोलिसांनी त्वरित बंद पाडावा.

म्हणून ३०७ अन्वये गुन्हा नोंद नाही !

मुरगाव पोलिस स्थानकांत संपर्क साधला असता तक्रारदार सचिन भगत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे नोंद केले आहेत. तसेच भगत यांना गंभीर दुखापत न झाल्याने संशयितावर भादंस ३०७ गुन्हा नोंद होऊ शकत नाही. याप्रकरणी पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून संशयितांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सचिन भगत यांच्यावर हल्ला म्हणजे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यावर हल्ला आहे. भगत हे आमदार आमोणकर यांचे सच्चे मित्र तसेच कार्यकर्ते असून त्यांनी भगत यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तसेच पोलिसांनी चारही आरोपींवर भादंस ३०७ गुन्हा दाखल करावा.

- जयेश शेटगांवकर, तृणूमुल काँग्रेसचे सदस्य

आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण लढा देणार आहे. चौघांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींवर भादंस ३०७ नुसार गुन्हा नोंद करायला हवा.

- सचिन भगत, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT