Vasco वास्को येथील पोर्ट अँड डॉक कामगार सोसायटीच्या शिष्यवृत्ती सोहळ्यात उपस्थित प्रमुख पाहुणे कॅप्टन हिमांशू शेखर, ॲड. मांगिरीश केंकरे, सुभाष साळगावकर व इतर.
Vasco वास्को येथील पोर्ट अँड डॉक कामगार सोसायटीच्या शिष्यवृत्ती सोहळ्यात उपस्थित प्रमुख पाहुणे कॅप्टन हिमांशू शेखर, ॲड. मांगिरीश केंकरे, सुभाष साळगावकर व इतर. Dainik Gomantak
गोवा

वाहतूक व्यवस्थापक कॅप्टन 'हिमांशू शेखर' यांचे शिक्षकांना आवाहन..

दैनिक गोमन्तक

दाबोळी: विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांच्या आवडीनिवडी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न पालक वर्गाबरोबर शिक्षक यांनी करावा. भविष्यात हेच विद्यार्थी देशसेवेसाठी आपली महत्त्वाची भूमिका बजावतील असे प्रतिपादन मुरगाव पत्तन न्यासाचे वाहतूक व्यवस्थापक कॅप्टन हिमांशू शेखर (Capt. Himanshu Shekhar's) यांनी केले.

वास्को बायणा रवींद्र भवनच्या मिनी सभागृहात आयोजित गोवा पोर्ट अँड डॉक कामगार कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या ३५ व्या वार्षिक वर्धापन दिनी सोसायटीच्या भागधारकांच्या शालेय विद्यार्थ्यांचा वार्षिक शिष्यवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन हिमांशू शेखर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत सन्माननीय पाहुणे सरकारी पतसंस्थेचे नियुक्त निबंधक ॲड. मांगिरीश केंकरे, सोसायटीचे चेअरमन सुभाष साळगांवकर, उपाध्यक्ष नवनाथ नाईक, सरचिटणीस संजय बाणावलीकर, खजिनदार प्रदीप बांदेकर, संचालक रवी लुईस, वाय प्रसन्नवर व पालक, विद्यार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना कॅप्टन हिमांशू शेखर म्हणाले की विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या आवडी सुद्धा देण्याचा प्रयत्न करावा तेव्हाच विद्यार्थ्यांना कुशल नेतृत्व प्राप्त होते.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन या पतसंस्थेने एका प्रकारे समाज कार्य केले असल्याची माहिती कॅप्टन हिमांशू शेखर यांनी दिली. यावेळी ॲड. मांगिरीश केंकरे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष सुभाष साळगावकर तर वार्षिक अहवाल सरचिटणीस संजय बाणावलीकर यांनी सादर केला. पाहुण्यांची ओळख संचालक वाय प्रसन्नवर यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार प्रदीप बांदेकर तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष नवनाथ नाईक यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT