Vasco bank robbery attempt Dainik Gomantak
गोवा

Vasco Bank Theft: वास्कोत बँक लुटण्‍याचा डाव उधळला! पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला प्रयत्न; बेळगावच्या व्यक्तीला अटक Video

Vasco Bank Robbery Attempt: गस्त घालणारे पथक तेथील ईटर डेन रेस्टॉरंटजवळून जात असताना त्या पथकाला बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूने काहीतरी आवाज येत असल्याचे ऐकू आले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सोमवारी (ता.२३) पहाटे चारच्या दरम्यान एका व्यक्तीने घुसण्यासाठी केलेला प्रयत्न वास्को पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे फसला. याप्रकरणी वास्को पोलिसांनी मूळचा बेळगावीचा परंतु सध्या वरुणपुरी-मांगोरहिल येथे राहणाऱ्या रायप्पा चन्नाप्पा श्रीरागणवी (५०) याला अटक केली आहे.

त्याने बँकेमध्ये चोरी करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिल्याचे वास्को पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात उभे केले असता, न्यायाधीशांनी दोन दिवस पोलिस कोठडीचा रिमांड दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जोशी चौकात बँक ऑफ इंडियाची वास्को शाखा आहे. या बँकेनजीक असलेल्या वास्को रेल्वे स्थानकाजवळ वास्को पोलिस रात्रीची नियमित गस्त घालीत होते.

गस्त घालणारे पथक तेथील ईटर डेन रेस्टॉरंटजवळून जात असताना त्या पथकाला बँक ऑफ इंडियाच्या मागील बाजूने काहीतरी आवाज येत असल्याचे ऐकू आले. यामुळे त्या पथकाचा संशय बळकावला. त्यांनी मागील बाजूस जाऊन तेथे पाहणी केली असता, एक व्यक्ती त्या बँकेच्या मागील बाजूस सलेल्या खिडकीच्या ग्रिलला धरून बसली होती.

पिशवीत लाल टॉर्च, ब्लेड...

काळी टोपी, हिरवी हाफ बिनबाह्याचे टी शर्ट, निळी ट्रॅक पँट त्या व्यक्तीने घातली होती. तेथे पोलिसांना पाहताच त्याने त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीसह तेथून पळून जाण्याचा प्रयत्‍न केला. तथापि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची पाहणी केली असता, त्या पिशवीमध्ये काळ्या इन्सुलेशन टेपमध्ये गुंडाळलेली एका लाल टॉर्च, हॅँडलसह एक एक्सो-ब्लेड वगैरे साहित्य मिळाले.

त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने तेथे चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली. अधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्लेटो कार्वालो, हवालदार संतोष भाटकर, पुरुषोत्तम ( बाळू)नाईक, शिपाई व्यंकट गवंडर, संगमेश बिरादार, संतोष नाईक, अनिल जाधव, आशिष आरोलकर यांनी सदर कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT