Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वास्‍को जळीतकांड; नवा मुद्दा समोर शिवानी तडफडत होती आणि अनुराग...

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: अगदी नियोजनबद्धरित्‍या आपली पत्‍नी शिवानी आणि सासू जयदेवी या दोघींचा नौदलात अधिकारी म्‍हणून काम करणाऱ्या अनुराग राजवत याने खून केला असा पोलिसांनी दावा केलेला असतानाच ज्‍यावेळी ही दुर्घटना घडली, त्‍यावेळी सर्वांत प्रथम घरात प्रवेश करणारा अनुरागच होता. त्‍यावेळी होरपळलेल्‍या शिवानी आणि जयदेवी यांची धडपड चालू होती.

एकीच्‍या पायाला आग लागलेली दिसत होती. मात्र, ती आग विझविण्‍याचा किंवा आगीत होरपळलेल्‍या त्‍या दोघींना प्रथमोपचार देण्‍याचा अनुरागने कुठलाही प्रयत्‍न केला नाही.

वास्‍को जळीतकांड प्रकरणात संशयित अनुरागने आपल्‍याला जामीन मिळावा यासाठी दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात अर्ज केला असून आज हा अर्ज दक्षिण गोव्‍याचे प्रधान सत्र न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर आला असता हा नवीन मुद्दा समोर आला. या प्रकरणात संशयित अनुराग पोलिसांना सहकार्य करत नसल्‍यामुळे त्‍याचा जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी वास्‍को पोलिसांनी केली आहे.

या प्रकरणात आपलीही बाजू ऐकून घ्‍यावी यासाठी मूळ तक्रारदार असलेला शिवानीचा भाऊ शुभम सिंग चौहान याने जी हस्‍तक्षेप याचिका दाखल केली होती, ती न्‍या. आगा यांनी मान्‍य केली.

यावेळी शुभमसिंग यांच्‍यावतीने युक्तिवाद करताना ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी अनुराग नौदलात मेकॅनिकल विभागात काम करत होता आणि त्‍यामुळेच असे स्‍फोट कसे घडवून आणले जाऊ शकतात याची त्‍याला पूर्ण कल्‍पना असण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही या मुद्याकडे लक्ष वेधले.

आपली सासू निरंजन पेटवून पूजा करणार याची पूर्ण कल्‍पना अनुरागला होती. त्‍यामुळेच त्‍याने हा स्‍फोट घडवून यावा यासाठी मुद्दामहून गॅस खुला ठेवला आणि त्‍यानंतर ताे स्‍वत: घराबाहेर पडला असा दावा केला.

अनुरागच्‍यावतीने बाजू मांडताना त्‍याच्‍या वकिलाने या प्रकरणात अनुरागला विनाकारण गोवण्‍यात आले आहे.

आपल्‍या अशिलाकडून पोलिसांना पूर्ण सहकार्य मिळते असा दावा करून त्‍याला जामीनमुक्‍त करावे अशी मागणी केली. या जामीन अर्जावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला. 17 जानेवारी रोजीपर्यंत या अर्जावरील निकाल न्‍या. आगा यांनी राखून ठेवला आहे.

देवाला निरांजन दाखविण्‍यापूर्वी...

अनुरागची सासू जयदेवी देवभक्‍त होत्या. देवासमोर दिवा ठेवण्‍यापूर्वी त्या घरभर पेटते निरांजन फिरवत होत्या. ज्‍या दिवशी ही दुर्घटना घडली त्‍यावेळी जयदेवी पूजा करण्‍याच्‍या तयारीत होत्या, अशी माहिती अनुरागने तपास यंत्रणेला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT