Varsha Usgaonker Big Boss Exit Dainik Gomantak
गोवा

Big Boss Marathi: गोव्याच्या वंडरगर्लची बिग बॉसमधून एक्झिट! भावूक पोस्ट करत म्हणाली...

Big Boss Marathi 5 Eviction: वर्षा उसगांवकर बिग बॉस सीजन-५ मधून बाहेर

गोमन्तक डिजिटल टीम

Big Boss Marathi Season 5 Eviction

बिग बॉस हिंदी प्रमाणेच बिग बॉस मराठी सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतंय. आता सुरु असलेल्या बिग बॉस सीजन-५ ला मराठी प्रेक्षक भरगोस प्रतिसाद देत आहेत. यंदाच्या सीजनसाठी हा कार्यक्रम केवळ ७० दिवसांसाठी चालणार असून मिडविक एव्हिक्शनमधून काल एक महत्वाची स्पर्धक बाहेर पडली.

ही स्पर्धक आणखीन कोणी नसून गोव्याची मुलगी वर्षा उसगांवकर आहे. बिग बॉस सीजन-५ मध्ये वर्ष उसगावकर यांच्यासह अनेक कलाकार आणि गायक मंडळी सामील झाली होती.

वयाचे बंधन मागे टाकून वर्षा उसगांवकर यांनी इतर स्पर्धकांना टक्कर दिली. ७० दिवसांच्या या सिजनमध्ये ६७ दिवस टिकून राहण्यात त्या यशस्वी ठरल्या मात्र काल त्यांना बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. वर्षा उसगावकर यांचं बिग बॉस जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असलं तरीही त्यांनी चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणतायत वर्षा उसगांवकर?

आपल्या पोस्ट मध्ये वर्षा उसगांवकर यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणतात की बिग बॉसच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला नव्याने ओळखलं आहे. काही आव्हानं नक्कीच आली मात्र नवीन मित्र देखील बनले असं म्हणत त्यांनी संपूर्ण अनुभवाला एक सकारात्मक जोड दिलीये. शेवटी सर्व प्रेक्षक, चॅनल आणि चाहत्यांचे आभार मनात त्यांनी मनोरंजनाचा हा प्रवास कायम सुरु राहील अशी खात्री दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

SCROLL FOR NEXT