Varsha Usgaonkar Goa Dainik Gomantak
गोवा

Varsha Usgaonkar: 'गोवा हे माझे घर... गोमंतकीय ही माझी माणसे'! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी उधळली स्तुतीसुमने

Varsha Usgaonkar Goa: गोवा म्हणजे माझे घर आहे आणि गोमंतकीय माणसे माझी आहेत, गोव्यात आल्यावर माझ्या घरातच आल्यासारखे वाटत असल्याचे उद्‍गार प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी काढले.

Sameer Panditrao

फोंडा: गोवा म्हणजे माझे घर आहे आणि गोमंतकीय माणसे माझी आहेत, गोव्यात आल्यावर माझ्या घरातच आल्यासारखे वाटत असल्याचे उद्‍गार प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी काढले.

कोडार - फोंडा येथील नंदनवन सभागृहात आज विकसिनी मंडळातर्फे राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या सहकार्याने आयोजित ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्तच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी विकसिनी मंडळाच्या अध्यक्ष ज्योती कुंकळ्येकर उपस्थित होत्या.

वर्षा उसगावकर म्हणाल्या की, गोवा हे पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध आहे, तसेच येथील आदरातिथ्यही फार महत्त्वाचे आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्याला तीन दशके होऊन गेली तरी अजूनही बरेच काही शिकायचे आहे असे वाटते.

महाविद्यालयात गेल्यानंतर आपले व्यक्तिमत्त्व फुलले, तेथील प्राध्यापक आणि इतरांचे सहकार्य लाभले. विकसिनी मंडळाच्या अध्यक्ष ज्योती कुंकळ्येकर या खऱ्या दृष्टीने कणखर महिला असून सामाजिक क्षेत्रात त्यांच्याकडून दिले जाणारे योगदान उल्लेखनीय आहे.

ज्योती कुंकळ्येकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविकात आजचा युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यविषयी विचार मांडले. आजचा युवक हा काहीसा निराश वैतागल्यासारखा वाटतो. ज्येष्ठ नागरिकांचे समाजाप्रती असलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही, असे कुंकळ्येकर यांनी सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. वर्षा उसगावकर व इतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले.

भारतीय मानसिकता बदलली पाहिजे

परदेशाशी तुलना करताना आपली भारतीय मानसिकता बदलली पाहिजे, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. साठी झाली की बहुतांश भारतीय माणूस निवृत्ती झाल्याचे जाहीर करून सामाजिक क्षेत्रापासून दूर राहतो, पण परदेशात साठी झाल्यानंतरही तेथील लोकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. ते लोक कुणावरही विसंबून राहत नाही, स्वतःचे काम स्वतःच करतात, पण आपण मात्र इतरांवर विसंबून राहतो, हे बदलले पाहिजे. साठीनंतर खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरवात होते, असे माझे तरी मत असल्याचे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची डरकाळी! डिचोली परिसरात दहशत; रात्री रस्त्यांवर शुकशुकाट

Vasco Accident: टेम्पो-मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात, दोन्‍ही चालक जखमी; वाहतूक काही काळ ठप्प

Canacona: बाजार करण्यासाठी नेले, दुपट्ट्याने पत्नीचा गळा आवळून केला खून; गोव्यातून गेला बिहारला, संशयिताची झाली निर्दोष सुटका

Goa Team Cricket Captain: गोव्याच्या महिला संघासाठी नवी कर्णधार! विनवी गुरव हिच्याकडे नेतृत्व; T20 मोहीमेला होणार सुरुवात

Goa Live News: "पक्षासाठी नाही तर गोव्यासाठी काम"

SCROLL FOR NEXT