Varsha R. Bale Dainik Gomantak
गोवा

Goa Consumer Court : गोवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षपदी वर्षा बाळे

पहिल्यांदाच गोवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षपद एका महिलेकडे आले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून आयोगाच्या ज्येष्ठ सदस्या वर्षा बाळे यांच्याकडे ताबा देण्यात आला आहे. पहिल्यांदाच या आयोगाचे अध्यक्षपद एका महिलेकडे आले आहे. गोवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान वर्षा बाळे यांना मिळाला आहे.

दरम्यान, या आयोगाचे यापूर्वीचे प्रभारी अध्यक्ष धनंजय जोग हे महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत असल्याने आता त्यांची जागा ॲड. बाळे या घेणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना या आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात येते. पण अध्यक्ष नसल्यास आयोगाच्या ज्येष्ठ सदस्यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. या पूर्वी या आयोगाचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती उत्कर्ष बाक्रे हे फेब्रुवारी 2020 मध्ये निवृत्त झाले होते.

त्यानंतर या आयोगावर अध्यक्ष म्हणून कुणाचीही नेमणूक केली नव्हती. अध्यक्षांच्या गैर हजेरीत जोग हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आता नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत बाळे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT