37th National Games Goa Dainik Gomantak
गोवा

37th National Games Goa 2023: क्रीडा संघटनांची माघार; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मशाल अनावरणाला लावणार हजेरी

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर संघटनांनी बहिष्कार मागे घेतला.

Rajat Sawant

37th National Games Goa 2023: राज्यातील विविध क्रीडा संघटनांनी आज होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मशाल अनावरण कार्यक्रमावरील बहिष्कार मागे घेतला आहे. याबाबतची गोवा ऑलिम्पिक संघटनेने जाहीर केले.

सरकार विविध क्रीडा संघटनांना 80 टक्के निधी देणार आहे. पैसे आधिच एसएजीमध्ये जमा आहेत. निधी मिळण्यास विलंब म्हणून संघटनांनी मशाल कार्यक्रमावर बहिष्कार टाकू नये असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर संघटनांनी बहिष्कार मागे घेतला.

गुरुवारी गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या झेंड्याखाली विविध खेळांच्या राज्य संघटनांनी तीव्र निषेध नोंदवित शुक्रवारी होणाऱ्या स्पर्धा मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय क्रीडा संघटनांनी घेतला होता.

दरम्यान संघटनांच्या निर्णयावर मुख्यमंत्री म्हणाले, मागच्या वेळी केवळ 60 खेळाडूच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले. त्यावेळी संघटनांनी शिबिरासाठी 1,500 नावे दिली होती. ती नावे तपासण्यास वेळ लागला. या कारणासाठी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणे योग्य नव्हते असे आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT