Mumbai-Goa Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारतला 'ब्रेक', 100 हून अधिक फेऱ्या रद्द

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यामुळे मुंबई आणि गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Sameer Amunekar

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यामुळे मुंबई आणि गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या 100 हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या या जलदगती गाडीच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील वेळांमध्ये बदल करण्यात आला असून, अनेक फेर्‍या थांबवण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. या वेळापत्रकाची अंमलबजावणी १५ जून २०२५ पासून २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत केली जाणार आहे.

या कालावधीत कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वे प्रवासात अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहेत.

पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत

विशेषतः जलदगती गाड्यांना या बदलांचा सर्वाधिक फटका बसत आहे. वेग मर्यादित ठेवण्यात येत असल्याने काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत, तर काहींच्या वेळांमध्ये बदल केला जात आहे. यंदा या बदलांचा सर्वाधिक परिणाम ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर झाला आहे.

कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बाब निश्चितच त्रासदायक ठरणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते.

याच काळात मुंबई-गोवा दरम्यानच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास पसंत करतात. मात्र, पावसाळी कालावधीत म्हणजेच जून ते ऑक्टोबर या महिन्यांदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसच्या शंभरहून अधिक फेर्‍या रद्द करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मग तुम्हीच तो DPR जनतेसमोर आणा!’ मुरगाव बंदरातील कोळसा वाहतुकीवरुन अमित पाटकरांचं सुदिन ढवळीकरांना थेट आव्हान

Viral Video: व्हायरल होण्याचा हव्यास ‘आंटींला' पडला भारी, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले,'हे रिलवाले...'

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात कोकणवासीयांची कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे त्रस्त

SCROLL FOR NEXT