Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Vande Bharat Express: गोमंतकीयांसाठी मुंबई अवघ्या साडेसात तासांवर

‘वंदे भारत’ धावणार 3 जूनपासून : पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन; 22 राज्यांमध्ये ट्रेनचे जाळे

गोमन्तक डिजिटल टीम

Mumbai-Goa Vande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर देशातील सर्वांत जलद गतीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ रेल्वे गोवा-मुंबई मार्गावरून 3 जून रोजी धावणार आहे. शनिवारी सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मडगाव रेल्वे स्थानकावरून सुरू होणाऱ्या या गाडीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

180 किलोमीटर प्रतितास या गतीने धावणाऱ्या या गाडीमुळे मडगाव ते मुंबईदरम्यानचा प्रवास सात ते साडेसात तासांत पूर्ण करता येणार आहे.

उद्‍घाटनानंतर 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

1,580 रुपये तिकीट

मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असेल. या गाडीचे चेअर कार 1,580 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार 2870 रुपये प्रतिव्यक्ती तिकीट असेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यात बदल होण्याची शक्यताही रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय रेल्वेकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी हेच वेळापत्रक लागू होऊ शकते, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दैनिक ‘गोमन्तक’ला दिली आहे.

मडगाव येथून वंदे भारत दुपारी 2.35 वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ 5.35 आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री 10.35 वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी 5.35 वाजता सुटेल. ठाणे 6.05, पनवेल 6.40, खेड 8.40, रत्नागिरी 10.00, मडगाव दुपारी 1.25 अशा तिच्या वेळा असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT