Villagers of Uste-Bodanwada giving a statement to Nagargaon Panchayat Secretary Vinayak Gawkar Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : परिसर घाण करणाऱ्यांवर कारवाई करा; उस्ते ग्रामस्थांची मागणी

उस्ते ग्रामस्थांची मागणी : निवेदन मिळताच नगरगाव पंचायतीकडून बंधाऱ्याची पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : उस्ते-सत्तरी येथील सरकारी बंधारा भागात दररोज मोठ्या संख्येने लोक मौजमजेसाठी येतात. पण काही बेधुंद, बेशिस्त लोकांकडून परिसर घाण केला जातो आहे. बियर, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा तिथेच टाकला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाटल्यांचा खच बंधारा परिसरात पडलेला आहे.

अशा धुमशान घालणाऱ्या व अस्वच्छता करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, असे निवेदन उस्ते-बोडणवाडा ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.१८) नगरगाव ग्रामपंचायतीला सादर केले आहे. पंचायतीचे सचिव विनायक गावकर व सरपंच संध्या खाडीलकर यांनी निवेदनाची दखल घेत उस्ते बंधारा भागात जाऊन परिसराची पाहणी केली आहे.

गोव्यातील स्थानिक लोकांकडूनच बंधाऱ्यात धुमशान घातले जात आहे. दारू प्राशन करून मोठमोठ्याने किंचाळणे, आवाज करणे, नको ती अश्‍लील भाषा वापरणे हे प्रकार केले जातात. दारू पिऊन त्या परिसरातही रिकाम्या बाटल्या फोडल्या जातात. बंधाऱ्याच्या फळ्याही फोडल्या जातात. त्यामुळे पाण्याची पातळी कमी होते आहे. त्याचा परिणाम सिंचनावर होऊ शकतो.

पंचायतीने बंधारा परिसराची पाहणी केली असता, परिसर कचऱ्याने व्यापलेला दिसून आला. येत्या काही दिवसांत परिसराची साफसफाई पंचायतीतर्फे केली जाईल व तिथे कचरापेटीची ठेवली जाईल. ग्रामस्थांनी दिलेले निवेदन पंचायतीने वाळपई पोलिस, सत्तरी उपजिल्हाधिकारी, मामलेदार, म्हादई वन विभाग यांना पाठविले आहे. बेशिस्त लोकांवर कारवाईसाठी कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.

- संध्या खाडीलकर, सरपंच, नगरगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT